'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा...'; स्टेटस अपडेट करून प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 19:40 IST2022-01-03T19:39:12+5:302022-01-03T19:40:05+5:30

मित्रांनी स्टेट्स पाहून दोघांना ही अनेक कॉल केले मात्र त्यांनी रिसीव्ह केले नाही.

'Pay tribute to us ...'; The couple ended their life journey by updating whatsapp status | 'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा...'; स्टेटस अपडेट करून प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा

'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा...'; स्टेटस अपडेट करून प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा

मनाठा (नांदेड): सोशल मीडियात 'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा..', असे स्टेट्स अपलोड करून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी वडगाव येथे उघडकीस आली आहे. शशिकांत रामराम पाटील (२४) व शिवानी केशव हरण (२२) असे मृत युगुलाचे नाव आहे.

शशिकांत व शिवानी या दोघांची जात एकच होती. मात्र, एकाच समाजातील असूनही पोटजातीमुळे आपल्या विवाहाला घरच्या मंडळीकडुन मान्यता मिळणार नाही अशी भीती त्या दोघांना होती. या भीतीमधुनच प्रेमीयुगुलाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. वडगाव शिवारात विषारी द्रव्य प्राशन करून त्यांनी जिवन यात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सोशल मीडियात 'आम्हाला श्रद्धांजली अर्पण करा' असे स्टेटेस ठेवल्याचे पाहिल्याने शशिकांत याच्या मित्रांनी त्यांना फोन केला. पण दोघांनीही कॉल रिसीव्ह केले नाही. त्यामुळे मित्रांनी शशिकांत याच्या वडीलांना फोन केला. त्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध केली. काही वेळाने दोघांचे मृतदेह शिवारात आढळले. तामसा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगीरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. यानंतर दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: 'Pay tribute to us ...'; The couple ended their life journey by updating whatsapp status