नांदेड/परभणी: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' या विशेष मोहिमेमुळे एका नऊ वर्षांच्या चिमुरड्याची सुखरूप सुटका झाली असून, त्याला सुरक्षितपणे त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घरगुती भांडणामुळे घर सोडलेल्या या मुलाला परभणी आरपीएफने तत्परतेने शोधून काढत वडिलांशी भेट घडवून आणली.
प्रवाशाची सतर्कता ठरली मोलाचीही घटना ९ मार्च रोजी मानवत रोड रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. देवेंद्र नावाचा हा मुलगा संशयास्पद अवस्थेत स्थानकावर फिरत असताना अमोल सुरेश आंबेकर या सतर्क प्रवाशाच्या नजरेस पडला. त्यांनी वेळ न घालवता या मुलाला परभणी येथील आरपीएफ पोस्टमध्ये नेले. पोलिसांनी प्रेमाने चौकशी केली असता, घरातील वादाला कंटाळून घर सोडून आल्याचे देवेंद्रने सांगितले.
पुन्हा झाली बाप-लेकाची भेटआरपीएफ अधिकाऱ्यांनी तातडीने मुलाच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर 'चाइल्डलाइन' आणि बालकल्याण समितीसमोर मुलाला हजर करण्यात आले. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर देवेंद्रला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या या संवेदनशील कामगिरीमुळे एका विखुरलेल्या कुटुंबाची पुन्हा भेट झाली असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
Web Summary : RPF's 'Operation Nanhe Farishte' reunited a nine-year-old runaway with his father in Parbhani. A vigilant passenger alerted RPF after finding the boy at Manvat Road station. The boy had left home due to a family dispute. After due process, he was safely returned to his family.
Web Summary : आरपीएफ के 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' ने परभणी में नौ साल के एक भगोड़े को उसके पिता से मिलाया। एक सतर्क यात्री ने मनवत रोड स्टेशन पर लड़के को देखने के बाद आरपीएफ को सतर्क किया। लड़का पारिवारिक विवाद के कारण घर से भाग गया था। उचित प्रक्रिया के बाद, उसे सुरक्षित रूप से उसके परिवार को लौटा दिया गया।