एक चिमुकली आठ महिन्यांची, दुसरी ८ वर्षाची, नराधम बापाने दोघींवर केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:30 IST2024-07-08T15:29:17+5:302024-07-08T15:30:19+5:30

नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेत बापानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

One little girl was 8 months old, the other was 8 years old. Both were abused by the father | एक चिमुकली आठ महिन्यांची, दुसरी ८ वर्षाची, नराधम बापाने दोघींवर केला अत्याचार

एक चिमुकली आठ महिन्यांची, दुसरी ८ वर्षाची, नराधम बापाने दोघींवर केला अत्याचार

कंधार : तालुक्यातील नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, बापानेच पोटच्या ८ महिन्यांच्या व दुसऱ्या ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बापाला अटक केली असून, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहितीनुसार, आठ महिन्यांची मुलगी व दुसरी आठ वर्षांची मुलगी ही तिच्या आई-वडिलांसह शहरातील एका भागात राहते. यापूर्वीही बापाने मुलीसोबत असे कृत्य केल्याचे आढळून आले होते. पत्नीने समज देऊन समजावून सांगितले होते; पण हे कृत्य पुन्हा झाल्याचे जून महिन्यात पत्नीच्या निदर्शनास आले. पुन्हा समजावून सांगण्यात आले; पण हा प्रकार वाढत जात असल्यामुळे शेवटी पत्नीने पोलिस स्टेशन गाठून सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पती व मुलीच्या बापाविरुद्ध कलम ३७६ व सह अन्य कलमांनुसार बाल लैंगिक अत्याचारानुसार ७ जुलैच्या पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. बापाला अटक करण्यात आली असून, न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे हे करीत आहेत.

Web Title: One little girl was 8 months old, the other was 8 years old. Both were abused by the father