शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जातीनिहाय जनगणना, आरक्षणासह इतर मागण्यांसाठी भोकरमध्ये ओबीसी एकवटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:13 IST

सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून, अराजकीय लढा निर्माण झाला तरच ओबीसींचे आरक्षण मिळणार

भोकर : ओबीसींना राजकीय आरक्षण, ओबीसी जणगणना यासह विविध सामाजिक समस्यांसाठी भोकर येथे ओबीसी प्रवर्गातील बांधव आज ओबीसी सन्मान सोहळ्यानिमित्त एकवटले होते. तत्पूर्वी प्रमुख रस्त्याने निघालेल्या दुचाकी रॅली मधून शक्ती प्रदर्शन करीत, मी ओबीसी या घोषणेने शहर दणाणले होते. 

शहरातून निघालेली रॅली तहसील कार्यालय येथे पोहोचली. यावेळी नायब तहसीलदार रेखा चामनार यांच्याकडे ओबीसी समन्वय समितीतर्फे न्याय हक्कांच्या मागण्यांचे निवेदन दिले. तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने आयोजित शहरातील ओम लाॅन्स येथे नरसारेड्डी गोपीलवाड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी सन्मान मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मणराव हाके यांनी मार्गदर्शन केले.  

यावेळी लक्ष्मणराव हाके म्हणाले की, इंग्रजांनी १८७१ ते १९३१ पर्यंत देशात जातीनिहाय जनगणना केली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी जात गणना झाली नाही. देशात विविध प्रकारची क्रांती झाली परंतु सामाजिक न्यायाची क्रांती झाली नाही. मंडल आयोगाला लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण द्यायचे होते. मात्र, तसे अद्याप झाले नाही. बिहारमध्ये जात गणना होते. पण, महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राकडे इंपेरिकल डाटा गोळा करायला पैसा मिळत नाही असा घणाघाती आरोप करुन, गरीबी संपली म्हणजे विकास नाही तर, सामाजिक समता प्रस्थापित झालीतरच विकास होईल असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

अजस्त्र हत्तीचं बळ ओबीसींमध्ये आहे.  न्याय हक्कासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून, अराजकीय लढा निर्माण झाला तरच ओबीसींचे आरक्षण मिळणार आहे, असे सांगून संघटीत लढा देण्याचे आवाहन हाके यांनी केले. प्रास्ताविक नामदेव आयलवाड यांनी केले. सुत्रसंचालन अंबादास आटपलवार यांनी केले. या मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील ओबीसी बांधव हजारोंच्या संख्येने प्रथमच एकवटल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणNandedनांदेड