सारभाई नव्हे, नीती सरकार आता दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या महाप्रबंधक

By प्रसाद आर्वीकर | Updated: March 14, 2023 13:53 IST2023-03-14T13:52:09+5:302023-03-14T13:53:35+5:30

मागील चार महिन्यात महाप्रबंधक पदी नियुक्ती होणाऱ्या तिसऱ्या अधिकारी

Not Sarabhai, Niti Sarkar is now General Manager of Nanded Division of South-Central Railway | सारभाई नव्हे, नीती सरकार आता दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या महाप्रबंधक

सारभाई नव्हे, नीती सरकार आता दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या महाप्रबंधक

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकपदी अमिता प्रसाद सारभाई यांची नियुक्ती रद्द झाली असून, त्यांच्या जागी नीती सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेनांदेड विभागाच्या महाप्रबंधक पदासाठी रेल्वे बोर्डाने १३ मार्च रोजी हे आदेश काढले आहेत.

यापूर्वी ७ मार्च रोजी नांदेड विभागाच्या महाप्रबंधक म्हणून मंत्रालयातील सांस्कृतिक विभागातील अमिताप्रसाद सारभाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आठच दिवसांनी हे आदेश रद्द करण्यात आले असून, रेल्वे बोर्डाचे संयुक्त सचिव व्ही.एस. दहिया यांनी हे आदेश काढले आहेत. त्यानुसार नांदेड विभागाच्या महाप्रबंधक पदी उत्तर रेल्वेतील निती सरकार यांची नियुक्ती केल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, मागील चार महिन्यात महाप्रबंधक पदी नियुक्ती होणाऱ्या निती सरकार या तिसऱ्या अधिकारी ठरल्या असून त्या रुजू होतात की नाही याची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Not Sarabhai, Niti Sarkar is now General Manager of Nanded Division of South-Central Railway