एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा , 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 14:39 IST2024-10-06T14:38:26+5:302024-10-06T14:39:28+5:30

सोयाबीनच्या शेंगा खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज 

Nine members of the same family poisoned, 12-year-old girl dies | एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा , 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा , 12 वर्षीय मुलीचा मृत्यू


नांदेड - नांदेड मध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा झाली .. उपचारा दरम्यान 12 वर्षीय मुलीचा मृत्यु झाला.सोयाबीनच्या शेंगा खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज असून मिरा  खानजोडे अस मयत मुलीचं नाव आहे.

सिडको येथील रहिवासी बबन खानजोडे यांनी तीन दिवसा पूर्वी नातेवाईकाच्या शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. काही शेंगा भावाच्या कुटुंबियाना दिल्या. गुरुवारी रात्री सर्वांनी सोयाबीनच्या शेंगा खाल्या, मात्र काही तासानंतर एकापाठोपाठ मळमळ उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर सर्वांना नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय दखल करण्यात आले होते. नऊ जना पैकी दोघांची प्रकृती अत्यव्यस्थ होती. रविवारी  मीरा खानजोडे या हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला... विषबाधा नेमकी कश्यामुळे झाली हे तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे

Web Title: Nine members of the same family poisoned, 12-year-old girl dies