नांदेडात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:44 IST2019-01-30T12:43:58+5:302019-01-30T12:44:57+5:30

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

In Nanded, robbery in the home of the retired police inspector | नांदेडात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडले

नांदेडात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडले

नांदेड : शहरातील परवाना नगर भागात सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि. २९ ) घडली. 

मिर्झा वहाब बेग असे अधिकाऱ्याचे नाव असून मंगळवारी (दि.29) घराला कुलुप लावून ते बहिणी कडे कार्यक्रमाला गेले होते. याच संधीचा लाभ घेत कडीकोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी कपाटातील रोख व दागिने मिळून सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. 

Web Title: In Nanded, robbery in the home of the retired police inspector