नांदेड : रेल्वेगाड्या आणि स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेशी व आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध नांदेडरेल्वे विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात आलेल्या सातदिवसीय विशेष मोहिमेत एकूण ५६ अनधिकृत विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २३,१६५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या सात दिवसांच्या कालावधीत वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड विभागांतर्गत विविध स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये सखोल तपासणी केली. या मोहिमेदरम्यान केवळ अनधिकृत विक्रेत्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, तर अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांच्या कामकाजाचीही बारकाईने पडताळणी करण्यात आली. अधिकृत विक्रेत्यांनी वैध परवाना व ओळखपत्र जवळ बाळगणे आणि रेल्वेने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, यावर विशेष भर देण्यात आला.
अनधिकृत विक्रीमुळे रेल्वेच्या केटरिंग व्यवस्थेवर परिणाम तर होतोच, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. ही समस्या लक्षात घेऊन पकडण्यात आलेल्या विक्रेत्यांना पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. रेल्वे परिसरात शिस्त व सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून, प्रवाशांच्या हितसंरक्षणासाठी रेल्वे विभाग यापुढेही अशा प्रकारची सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Web Summary : Nanded Railway Division penalized 56 unauthorized vendors during a week-long drive. Over ₹23,000 in fines were collected. The action ensures passenger safety, food hygiene, and regulated catering services. Unauthorized vendors threaten railway systems. The drive maintains order and protects passenger interests.
Web Summary : नांदेड़ रेल मंडल ने एक सप्ताह के अभियान में 56 अनाधिकृत विक्रेताओं पर जुर्माना लगाया। 23,000 रुपये से अधिक का जुर्माना वसूला गया। कार्रवाई यात्रियों की सुरक्षा, खाद्य स्वच्छता और विनियमित खानपान सेवाओं को सुनिश्चित करती है। अनाधिकृत विक्रेता रेलवे प्रणाली को खतरे में डालते हैं। अभियान व्यवस्था बनाए रखता है और यात्री हितों की रक्षा करता है।