शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 15:44 IST

Nanded Lok Sabha By Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

Nanded Lok Sabha By Election 2024 : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आतापर्यंत सर्वच पक्षांनी जवळपास आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, या विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकदेखील  (Nanded Loksabha byelection) होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. पण, काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोट निवडणूक होत आहे.

या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे भाजपला नांदेडसाठी उमेदवार मिळत नव्हता. पण, आता अखेर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतुक हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे संख्ये भाऊ आहेत. आता नांदेड लोकसभेत मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच 20 नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNandedनांदेडlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक 2024