शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: 'मी तुझीच राहील'; कुटुंबीयांकडून प्रियकराचा खात्मा; प्रेयसीने केले मृतदेहासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:29 IST

''आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपविले. असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहील''

नांदेड : बहिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी सायंकाळी एका तरुणाचा गोळी झाडून व डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला. दरम्यान, आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपविले. असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहील, असे म्हणत प्रेयसीने चक्क मृतदेहासोबत लग्न केले. प्रियकराला मारून कुटुंब हरले व त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी जिंकल्याची भावना मुलीने व्यक्त केली.

नांदेड शहरातील जुना गंज भागात पहेलवान टी हाऊसच्या पाठीमागे गुरुवारी सायंकाळी सक्षम ताटे हा मित्रांसोबत थांबलेला असताना हिमेश मामीडवार याच्यासोबत त्याचा वाद झाला. यावेळी हिमेश व त्याच्यासोबत असलेल्या एकाने सक्षमवर गोळी झाडली. ती गोळी त्याच्या बरगडीतून आत गेली. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या सक्षमच्या डोक्यात फरशी घालण्यात आली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी अवघ्या तासाभरात हिमेश मामीडवार आणि गजानन मामीडवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर साहिल मामीडवार व अन्य एकाला परभणी जिल्ह्यातील मानवत येथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यावर शुक्रवारी सायंकाळी सक्षमच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याची प्रेयसी आंचल सक्षमच्या घरी पोहोचली. सक्षम हयात नसला तरी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी कायम त्याच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे तिने सांगितले. तसेच याप्रकरणी वडील व दोन्ही भावांविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी मागणी तिने यावेळी केली. मृतदेहासोबत लग्न करण्याचा प्रकार फक्त चित्रपटापुरताच मर्यादित होता. मात्र, त्याची प्रत्यक्ष अनुभूती शुक्रवारी नांदेड शहरात पाहावयास मिळाली.

मैत्रीतून झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमातघटनेतील मृत सक्षम ताटे व मुख्य आरोपी हिमेश मामीडवार हे पूर्वाश्रमीचे मित्र असून, दोघेही हिस्ट्रीशिटर गुन्हेगार होते. त्यांच्यातील मैत्रीमुळे एकमेकांच्या घरी येणे-जाणे व्हायचे. दरम्यानच्या काळात सक्षम व हिमेशची बहीण आंचल यांच्यात जवळीक निर्माण झाली. ही बाब आंचलच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास विरोध दर्शविला. त्याउपरही सक्षम व आंचलचे प्रेमसंबंध गत तीन वर्षांपासून कायम होते. विरोध करून, वारंवार सांगूनही फरक पडत नसल्याने २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सक्षम व हिमेश जुन्या नांदेड भागात एकमेकांसोबत भिडले. या वादातून हाणामारी त्यानंतर गोळीबार व फरशीने वार करत मामीडवार पिता-पुत्रांनी सक्षमला कायमचे संपविले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Woman Marries Dead Lover After Family Kills Him

Web Summary : In Nanded, a man was murdered by a woman's family due to their relationship. Defying them, the woman married his corpse, declaring her love would endure despite their opposition.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड