शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडहून अवघ्या तासाभरात गाठता येणार गोवा समुद्रकिनारा, विमानसेवेचा मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:35 IST

नांदेडकरांनो, बॅगा भरा! आता तासाभरात गोव्याला पोहचा; विमानसेवेचा असा असेल 'रूट' आणि 'टाईम'

नांदेड : बहुप्रतीक्षित नांदेड-गोवाविमानसेवेस आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच ३१ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे अवघ्या तासाभरात गोवा येथे जाणे शक्य होणार असल्याने यंदाचा उन्हाळा निसर्गरम्य वातावरणात समुद्राच्या सान्निध्यात घालवता येणार आहे. ही सेवा शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस मिळणार असून, सोबतच नांदेड-नागपूर विमानसेवादेखील याच दिवशी सुरू होणार आहे.

नांदेड येथून गोवा बायरोड जायचे झाल्यास किमान १५ ते १८ तास लागतात, तर विमानाने जायचे झाल्यास हैदराबादपर्यंतचा ३०० किलोमीटरचा प्रवास करून विमान पकडावे लागत होते. उन्हाळी सुट्यात कोकणासह गोवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नांदेड ते गोवा विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात होती. सद्यस्थितीत स्टार एअर कंपनीची नांदेड येथून मुंबई, पुणे, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबाद विमानसेवा सुरू आहे. त्यात नांदेड-गोवा-नागपूर अशा नवीन विमानसेवेची भर पडली आहे. याशिवाय फ्लाय-९१ ही विमान कंपनी २९ मार्चपासून नांदेड-बंगळुरू विमानसेवा सुरू करणार आहे. त्यामुळे नांदेडहून बंगळुरूसाठी एकूण दोन विमानसेवा उपलब्ध होतील. नांदेड येथून विविध राज्यातील आठ शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होणार असून, भविष्यात आणखी काही शहरांना जोडण्याचा मानस असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

असे असेल नवीन विमानाचे वेळापत्रकगोवा (मोपा) - नांदेड - नागपूर ही विमानसेवा मार्चअखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवारवगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहील. या सेवेंतर्गत गोवा (मोपा) येथून सकाळी ९.३० वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी १०.५० वाजता नांदेड येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी ११.२० वाजता नांदेडहून उड्डाण घेऊन दुपारी १२.३० वाजता ते नागपूर येथे उतरेल. परतीच्या प्रवासात दुपारी १२.४० वाजता नागपूरहून उड्डाण घेणारे विमान दुपारी १.३० वाजता नांदेड येथे दाखल होईल. पुढे दुपारी २ वाजता नांदेडहून गोवा (मोपा)कडे उड्डाण करून दुपारी ३.२० वाजता तेथे पोहोचेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded to Goa in an Hour: Flight Service Starts Soon

Web Summary : Nanded-Goa flight service begins March 31, cutting travel time drastically. Six days a week, excluding Fridays, this service will also connect Nanded to Nagpur. A second Nanded-Bangalore flight starts March 29, improving connectivity. Future expansion to more cities is planned.
टॅग्स :Nandedनांदेडgoaगोवाtourismपर्यटनairplaneविमान