नांदेडहून अवघ्या तासाभरात गाठता येणार गोवा समुद्रकिनारा, विमानसेवेचा मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:35 IST2026-03-05T19:34:50+5:302026-03-05T19:35:17+5:30

नांदेडकरांनो, बॅगा भरा! आता तासाभरात गोव्याला पोहचा; विमानसेवेचा असा असेल 'रूट' आणि 'टाईम'

Nanded-Goa Direct Flight to Start from March 31; Check Full Schedule and Routes Here | नांदेडहून अवघ्या तासाभरात गाठता येणार गोवा समुद्रकिनारा, विमानसेवेचा मुहूर्त ठरला!

नांदेडहून अवघ्या तासाभरात गाठता येणार गोवा समुद्रकिनारा, विमानसेवेचा मुहूर्त ठरला!

नांदेड : बहुप्रतीक्षित नांदेड-गोवाविमानसेवेस आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच ३१ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे अवघ्या तासाभरात गोवा येथे जाणे शक्य होणार असल्याने यंदाचा उन्हाळा निसर्गरम्य वातावरणात समुद्राच्या सान्निध्यात घालवता येणार आहे. ही सेवा शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस मिळणार असून, सोबतच नांदेड-नागपूर विमानसेवादेखील याच दिवशी सुरू होणार आहे.

नांदेड येथून गोवा बायरोड जायचे झाल्यास किमान १५ ते १८ तास लागतात, तर विमानाने जायचे झाल्यास हैदराबादपर्यंतचा ३०० किलोमीटरचा प्रवास करून विमान पकडावे लागत होते. उन्हाळी सुट्यात कोकणासह गोवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नांदेड ते गोवा विमानसेवा सुरू करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात होती. सद्यस्थितीत स्टार एअर कंपनीची नांदेड येथून मुंबई, पुणे, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबाद विमानसेवा सुरू आहे. त्यात नांदेड-गोवा-नागपूर अशा नवीन विमानसेवेची भर पडली आहे. याशिवाय फ्लाय-९१ ही विमान कंपनी २९ मार्चपासून नांदेड-बंगळुरू विमानसेवा सुरू करणार आहे. त्यामुळे नांदेडहून बंगळुरूसाठी एकूण दोन विमानसेवा उपलब्ध होतील. नांदेड येथून विविध राज्यातील आठ शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होणार असून, भविष्यात आणखी काही शहरांना जोडण्याचा मानस असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

असे असेल नवीन विमानाचे वेळापत्रक
गोवा (मोपा) - नांदेड - नागपूर ही विमानसेवा मार्चअखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवारवगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहील. या सेवेंतर्गत गोवा (मोपा) येथून सकाळी ९.३० वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी १०.५० वाजता नांदेड येथे पोहोचेल. त्यानंतर सकाळी ११.२० वाजता नांदेडहून उड्डाण घेऊन दुपारी १२.३० वाजता ते नागपूर येथे उतरेल. परतीच्या प्रवासात दुपारी १२.४० वाजता नागपूरहून उड्डाण घेणारे विमान दुपारी १.३० वाजता नांदेड येथे दाखल होईल. पुढे दुपारी २ वाजता नांदेडहून गोवा (मोपा)कडे उड्डाण करून दुपारी ३.२० वाजता तेथे पोहोचेल.

Web Title : नांदेड से गोवा एक घंटे में: विमान सेवा जल्द शुरू

Web Summary : नांदेड-गोवा विमान सेवा 31 मार्च से शुरू, यात्रा का समय कम होगा। शुक्रवार को छोड़कर सप्ताह में छह दिन, यह सेवा नांदेड़ को नागपुर से भी जोड़ेगी। एक दूसरी नांदेड़-बैंगलोर उड़ान 29 मार्च से शुरू, कनेक्टिविटी में सुधार। भविष्य में और शहरों के लिए विस्तार की योजना है।

Web Title : Nanded to Goa in an Hour: Flight Service Starts Soon

Web Summary : Nanded-Goa flight service begins March 31, cutting travel time drastically. Six days a week, excluding Fridays, this service will also connect Nanded to Nagpur. A second Nanded-Bangalore flight starts March 29, improving connectivity. Future expansion to more cities is planned.