नांदेडमध्ये आगीचे तांडव सुरूच! गॅरेजच्या भीषण आगीत ३ महागड्या गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:25 IST2026-03-07T16:21:42+5:302026-03-07T16:25:11+5:30

नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आगीचे तांडव;  बाफना टी-पॉईंट परिसरातील गॅरेजमधील ३ गाड्या भस्मसात

Nanded Fire: Major Fire Breaks Out at Garage Near Bafna T-Point; 3 Luxury Cars Destroyed | नांदेडमध्ये आगीचे तांडव सुरूच! गॅरेजच्या भीषण आगीत ३ महागड्या गाड्या जळून खाक

नांदेडमध्ये आगीचे तांडव सुरूच! गॅरेजच्या भीषण आगीत ३ महागड्या गाड्या जळून खाक

नांदेड: शहरात सलग दुसऱ्या दिवशी आगीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी श्रीनगर भागातील तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर, शनिवार, ७ मार्च रोजीच्या पहाटे बाफना टी-पॉईंट जवळील अरमान डेंटिंग पेंटिंग या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या तीन महागड्या गाड्या जळून खाक झाल्या असून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे इतर चार वाहने वाचवण्यात यश आले आहे.

शनिवारी पहाटे २:१० वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाने बाफना टी-पॉईंट भागात आग लागल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या गाड्यांनी अचानक पेट घेतला होता. अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उपअधिकारी निलेश कांबळे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा केला. 

या आगीत स्कोडा, मारुती स्विफ्ट आणि महिंद्रा एक्सयूव्ही या तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले, मात्र जवानांनी गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी आलेल्या ४ गाड्यांचा आगीपासून यशस्वी बचाव केला. गॅरेज मालक तौफिक पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मोहिमेत सावळे, लांडगे, नरवाडे, शिंदे आणि वाहन चालक टारपे यांनी मोलाची भूमिका बजावली.

Web Title : नांदेड में आग का तांडव: गैराज में भीषण आग, तीन महंगी गाड़ियाँ खाक

Web Summary : नांदेड के बाफना टी-पॉइंट के पास एक गैराज में भीषण आग लग गई, जिसमें शनिवार को तीन कारें जलकर खाक हो गईं। दमकल कर्मियों ने चार अन्य वाहनों को बचाया। आग लगने का कारण अज्ञात है। एक स्कोडा, मारुति स्विफ्ट और महिंद्रा एक्सयूवी नष्ट हो गए। अधिकारी जांच कर रहे हैं।

Web Title : Inferno in Nanded: Garage Fire Engulfs Three Expensive Cars

Web Summary : A major fire broke out at a Nanded garage near Bafna T-Point, destroying three cars early Saturday. Firefighters saved four other vehicles. The cause remains unknown. A Skoda, Maruti Swift and Mahindra XUV were destroyed. Authorities are investigating.