नांदेडात महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न; चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 19:22 IST2018-12-13T19:20:26+5:302018-12-13T19:22:08+5:30

पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून एका ३६ वर्षीय महिलेस विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

In Nanded, filed an FIR against Four people who trying to kill women | नांदेडात महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न; चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेडात महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न; चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

नवीन नांदेड :  पैसे देण्या-घेण्याच्या वादातून एका ३६ वर्षीय महिलेस विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर बळीरामपुर येथील चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नांदेड परिसरातील भिमवाडी येथील रहिवासी रेवताबाई सदानंद गजभारे या २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास पैसे घेण्यासाठी बळीरामपूर येथील राहुल भीमराव चौदंते यांच्या घरी गेल्या. दरम्यान, राहुल व रेवताबाई यांच्यात पैसे देणे घेण्यावरून वाद झाले.

यावेळी राहुल याने कपिल चौदंते, पूजा चौदंते व कमलबाई चौदंते यांच्या मदतीने त्यांच्या तोंडात बळजबरीने विषारी द्रव्य टाकले. यानंतर आरोपींनी त्यांना बेशुद्धावस्थेत सुनील नगर येथील रोडच्या कडेला आणून टाकले आहे. या प्रकरणी रेवताबाई यांनी गुन्हा नोंदविण्यासाठी न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील चार आरोपींविरुद्ध १२ डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रसेनजित जाधव, पो.कॉ. तानाजी चाटे तसेच नामदेव मोरे करत आहेत.

Web Title: In Nanded, filed an FIR against Four people who trying to kill women