नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:45 PM2020-08-21T19:45:05+5:302020-08-21T19:46:22+5:30

मागील वर्षी जून, जुलै व आॅगस्ट असे तीन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़

Nanded district receives 94% of average rainfall | नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस

नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस

Next
ठळक मुद्देसर्वाधिक पाऊस नायगावमध्ये सर्वाधिक कमी माहूर तालुक्यात पाऊस

नांदेड : जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने नियमित हजेरी लावली आहे़ त्यामुळेच गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ५२७़० म्हणजेच सरासरीच्या ९४़४ टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक ११०़७८ टक्के पाऊस नायगाव तालुक्यात झाला आहे़ तर सर्वात कमी ७८़२१ टक्के पावसाची नोंद माहूर तालुक्यात झाली आहे़ 

मागील वर्षी जून, जुलै व आॅगस्ट असे तीन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ परतीच्या पावसाने जिल्हावासियांना दिलासा दिल्याने नंतरच्या काळात पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला़ त्यामुळेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणी उपबल्ध होते़ यंदा मात्र जून महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली़ जुलै आणि आॅगस्टमध्येही समाधानकारक पाऊस झाल्याने गुरुवारपर्यंत सरासरीच्या ९४़४ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ 

यात नांदेड तालुक्यात ९९़६ टक्के, बिलोली ८३़५९, मुखेड १०६़५४, कंधार ९४़२९, लोहा १११़७८, हदगाव ९६़९२, भोकर १०८़१८, देगलूर ९८़९४, किनवट ८३़९२, मुदखेड ९३़३९, हिमायतनगर ९९़०९, माहूर ७८़२१, धर्माबाद ९८़७७, उमरी १००़३२, अर्धापूर १०९़०७ तर नायगाव तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ११०़७८ टक्के पाऊस झाला आहे़


सरासरी १२़८ मिमी पाऊस
मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी १२़८ मिमी पाऊस झाला आहे़ यात हिमायतनगर २०़८, किनवट २२़८, देगलूर १४़३, भोकर १४़५, हदगाव १७़३ तर लोहा १३़८ आणि उमरी १०़८, तर नायगावमध्ये १०़५ मि़मी़ पाऊस झाला.
 

Web Title: Nanded district receives 94% of average rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.