शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर अत्याचार अन् थेट व्हिडिओ व्हायरल! भोकरमध्ये नराधमावर पोक्सो गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:03 IST

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; भोकरमध्ये अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या आरोपीची रवानगी जेलमध्ये.

भोकर (जि. नांदेड): सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि नंतर ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या एका विकृताला भोकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख करून १७ वर्षीय मुलीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपी अविनाश राजेश मानपुरे (रा. रेणापूर) याला न्यायालयाने १ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विश्वास संपादन करून केला अत्याचारमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश मानपुरे याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित मुलीशी ओळख वाढवली. हळूहळू तिचा विश्वास संपादन करून त्याने तिच्याकडून काही फोटो आणि व्हिडिओ मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी जेव्हा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा संतापलेल्या आरोपीने २८ मार्च रोजी इन्स्टाग्राम आयडीवरून तिचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करून तिची बदनामी केली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरूया प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबाने भोकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि ३० मार्च रोजी त्याला अटक केली. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला बुधवारी (१ एप्रिल) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलीस निरीक्षक अजित कुंभार आणि पोलीस हवालदार गुरुदास आरेवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram friendship leads to abuse, video leak; culprit arrested.

Web Summary : A man in Bhokar was arrested for befriending a minor on Instagram, blackmailing, abusing her, and leaking private videos. He faces charges under the POCSO Act. Police investigation continues.
टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी