नांदेड - शीख गुरूंचे शहादत आणि त्याग जगात अद्वितीय आहेत म्हणूनच त्यांच्या जयंती आणि शाहिदी समारंभही वैशिष्ट्यपूर्ण असतात, असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५०व्या शाहिदी समागमानिमित्त शनिवारी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री मान म्हणाले की, शीख गुरूंनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. 'सबका भला' हा एकमेव भाव त्यांच्या मनात होता. आज जगाला शीख गुरूंच्या त्यागाची तुलना करता येईल, अशी उदाहरणे सापडत नाहीत.
देश आणि धर्मासाठी आपले प्राण अर्पण करणारे असे महापुरुष किती महान असतील, असा प्रश्नही त्यांनी केला. आजही शीख समाजातील जवान देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. पंजाबची सीमा असो वा राजस्थान- सर्वत्र शीख सैनिक शत्रूशी ठामपणे मुकाबला करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
संत महंतांसह लाखो भाविकांची मांदियाळी‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागम वर्षानिमित्त शनिवारी सकाळी सचखंड गुरुद्वारा येथून नगर कीर्तन काढण्यात आले. संत-महंत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीने नांदेड नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. शहरातील प्रमुख रस्त्यावरून नगर कीर्तन मोदी मैदानावर पोहोचले. या ठिकाणी श्री गुरू ग्रंथ साहिबजी विधिवत विराजमान झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. २४ आणि २५ जानेवारी, असे दोन दिवस हिंद-दी-चादर शाहिदी समागम हा कार्यक्रम होणार आहे. देशभरातून आलेल्या भाविकांनी नगर कीर्तन व लंगरचा लाभ घेतला. समाजसेवेही संघटनांकडून सेवा दिल्या जात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेडमध्ये येणारकेंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह हे २५ जानेवारी रोजी नांदेडात हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या शाहिदी समागम कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता मोदी मैदान येथे त्यांचे आगमन होणार आहे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाला ते हजेरी लावतील.
Web Summary : Punjab CM Bhagwant Mann highlighted Guru Tegh Bahadur's sacrifice at Nanded's 'Hind-di-Chadar' event. A large procession marked the commencement, with devotees participating in prayers and community service. Union Minister Amit Shah will attend the concluding ceremony.
Web Summary : पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान ने नांदेड़ में 'हिंद-दी-चादर' कार्यक्रम में गुरु तेग बहादुर के बलिदान पर प्रकाश डाला। एक विशाल जुलूस के साथ शुरुआत हुई, जिसमें भक्तों ने प्रार्थना और सामुदायिक सेवा में भाग लिया। केंद्रीय मंत्री अमित शाह समापन समारोह में भाग लेंगे।