'नाव योगी अन् भक्त आसारामचे'; भाजपच्या अध:पतनाची सुरुवात उत्तर प्रदेशातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 14:31 IST2021-10-21T14:26:15+5:302021-10-21T14:31:01+5:30
Vijay Vaddetiwar फडणवीसांची जिरवयाची होती हे गडकरींनीच कानात सांगितले

'नाव योगी अन् भक्त आसारामचे'; भाजपच्या अध:पतनाची सुरुवात उत्तर प्रदेशातून
नांदेड : भाजपाच्या ( BJP ) अध:पतनाची सुरुवात आगामी उत्तर प्रदेशातील ( UP Election ) निवडणुकापासून होणार आहे. नाव योगी अन् सर्व भक्त आसारामचे असे आहे. त्यांचे आता बुरे दिन सुरु झाले आहेत. उत्तर प्रदेशातील मागील काही दिवसात घडलेल्या घटनांवरुन हे सिद्ध होते, असा दावा मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी केला. बुधवारी रात्री देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील सभेत ते बोलत होते.
वड्डेटीवार म्हणाले, बोलता बोलता त्यांची जिरली. पुन्हा ते जिरवणार आहेत. कुणा-कुणाची जिरते ते पहाच आता. कारण या देशाची हवा आता बदलली आहे. २०२४ मध्ये केंद्रात मोदी आणि शहा यांचे सरकार दिसणार नाही. कारण पापच त्यांनी एवढी केली आहेत. सरकारच अध:पतन आता अटळ आहे. महाआघाडीचे सरकार मजबूत असून हा फेविकॉलचा जोड आहे. त्यामुळे तुम्ही किती ईडी लावा, सीडी लावा. परंतु फेविकॉलचा हा जोड तुटणार नाही. आजपर्यंत सरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. थोडी आर्थिक परिस्थिती सुधारु द्या आणखी मदत केली जाणार आहे. रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरु आहे. बांधकाम मंत्री तुमच्या जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे रस्ते खराब कसे राहतील. असेही ते म्हणाले.
गडकरींना फडणवीसांची जिरवायची होती
नागपूरला एकीकडे गडकरी तर दुसरीकडे फडणवीस आहेत. दोघांची तोंडे ३६ आहेत. हे नागपूरकरांना चांगले माहिती आहे. त्यामुळे गडकरींनी आपल्या कानात गुपचुपपणे सांगितले होते, फडणवीसांची जिरवायची होती. बरं झाला जिरली असा गौफ्यस्फोट ही मंत्री वड्डेटीवार यांनी केला.