शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘माझा मुलगा इतरांमध्ये जिवंत राहील’; शेतकरी पित्याचा मोठा निर्णय, मृत मुलाचे अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:51 IST

दुर्दैवी मृत्यूच्या वेदनेतून अवयवदानाने दिली आशा; नांदेडच्या पंडित काळे यांचा हैद्राबादेत ग्रीन कॉरिडॉर

नांदेड : अपघाती मृत्यू झालेल्या तरुण मुलाला शेवटचा निरोप देताना शेतकरी पित्याचे डोळे पाणावले. “मुलाचा मृत्यू सहन होत नाही, पण त्याच्या जाण्यानंतर त्याचे अवयव कुणा गरजूंच्या जीवनात नवप्रकाश घेऊन आले, याचं समाधान आहे,” अशी भावना व्यक्त करून आपण समाजाचे देणे लागत असल्याचे दायित्व काळे कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगीही पार पाडले.

शेतकरी कुटुंबातील पंडित व्यंकटराव काळे (वय ४२रा.जुना कौठा, नांदेड) यांचा सासरवाडीकडून गावी परत येत असताना ३ जुलै रोजी डेरला पाटीजवळील पुलावर दुचाकी अपघात झाला होता. जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात दाखल केले होते. हृदय व अन्य अवयव काम करत असले, तरी मेंदूची संवेदना जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. मुलगा ब्रेनडेड झाल्याचे मान्य करणं काळे कुटुंबीयांसाठी अत्यंत अवघड ठरत होते. आशेचा शेवटचा किरण म्हणून नातलगांनी पंडित यास उपचारासाठी हैद्राबाद येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार करूनही प्रकृती सुधारणार नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले, तसेच अवयवदान केल्यास अन्य व्यक्तींच्या माध्यमातून मुलगा जिवंत असल्याची अनुभूती होईल, असा सल्ला समुपदेशकांनी दिला. त्यावर मरणोत्तर अवयदानाबाबत पंडित जागरूक होता, तसेच अपघाती अथवा अकाली निधन झाल्यास वापरायोग्य अवयव दान करावेत, अशी त्याची इच्छा असल्याचे सांगून शेतकरी असलेल्या या कुटुंबाने ग्रीन कॉरिडॉरसाठी अनुकूलता दर्शविली.

धाडसी निर्णय अनेकांसाठी प्रेरणास्रोत६ जुलै रोजी सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यावर, ७ जुलै रोजी सकाळी विशेष डॉक्टरांच्या टीमने हृदय, दोन्ही किडनी, यकृत (लिव्हर), फुप्फुस यांचे संकलन केले. या अवयवांना वेळेत योग्य रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. पंडित काळेंच्या मरणोत्तर योगदानातून देशातील विविध ठिकाणी अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर, सोमवारी रात्री उशिरा नांदेड येथे पंडित काळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत, पंडित काळेंना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. काळे कुटुंबाने घेतलेला हा धाडसी निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत असून, अवयवदानाबाबत जनजागृतीचे आणि विचारप्रवृत्त होण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेकांना जीवदान देऊन गेल्याचे समाधानतरुण मुलाचे अकाली निधन होईल, असे वाटले नव्हते. घटना दुर्दैवी असली, तरी जड अंतःकरणाने सत्य स्वीकारले. मरणोत्तर अवयवदानाच्या माध्यमातून पंडित भविष्यातही जगात कायम राहणार आहे. मुलाच्या जाण्याने आयुष्याची पोकळी कायम राहणार आहे. मात्र, आयुष्यभर ज्याने समाजाची सेवा केली आणि मृत्यूनंतरही तो गरजू, व्याधींनी ग्रासलेल्या अनेकांना जीवदान देऊन गेल्याचे समाधान असल्याची भावना शेतकरी असलेले पंडितचे वडील व्यंकटराव काळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NandedनांदेडOrgan donationअवयव दानMedicalवैद्यकीय