नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारात तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:13 IST2021-05-10T09:12:45+5:302021-05-10T09:13:51+5:30

घटनास्थळी मृतदेहा शेजारी दोरी आढळून आली आहे.

Murder of a youth in Asarjan Shivara near Vishnupuri project in Nanded | नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारात तरूणाचा खून

नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारात तरूणाचा खून

- शिवाजी राजूरकर
नांदेड : नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारातील पाईपलाईन परिसरात एका तरूणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हरमितसिंग पुजारी असे मृताचे नाव असून तो विष्णुपुरी परीसरातील रहिवासी आहे. 

घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या इतवारा उपविभागाचे डीवायएसपी सिध्देश्वर भोरे, नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोउपनि. शेख जावेद , असर्जन येथील पोलीस पाटील खंडेराव बकाल आदींनी रविवारी मध्यरात्रीच्या साडेबारा ते एक वाजेदरम्यान घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यावेळी, घटनास्थळी पांढरी दोरी आढळून आली असल्यामुळे मारेकऱ्यांनी मयत हरमितसिंघ पूजारी याचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.  

दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील डीबी तथा गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटेच असर्जन शिवारातील भगतसिंग चौक परिसरातून  दोन संशयित आरोपींना  जेरबंद केले असल्याचेही विश्वसनीय वृत आहे.

Web Title: Murder of a youth in Asarjan Shivara near Vishnupuri project in Nanded