पोटच्या दोन चिमुकल्यांची आईनेचे केली हत्या; मामा, आजीने मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:16 IST2022-06-02T14:15:43+5:302022-06-02T14:16:38+5:30

आईने असे कृत्य का केले हे समजू शकले नाही.

mother kills two childrens in Bhokar; Granma and uncle destroyed the evidence by burning the body | पोटच्या दोन चिमुकल्यांची आईनेचे केली हत्या; मामा, आजीने मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट

पोटच्या दोन चिमुकल्यांची आईनेचे केली हत्या; मामा, आजीने मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट

भोकर (नांदेड) : तालुक्यातील पांडुरणा येथे आईने दोन चिमुकल्यांची हत्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, चिमुकल्यांचे मृतदेह आजी आणि मामाने जाळून पुरावा नष्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आज पहाटे २.१० वाजता तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ध्रुपदबाई गणपत निमलवाड (३०  रा.पांडूरणा) असे प्रमुख आरोपीचे नाव आहे. ध्रुपदबाई पांडुरणा येथे शेत शिवारात आखाड्यावर पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह रहात होती. तिचे सासु - सासरे दुसऱ्या शेतात वास्तव्यास आहेत. ध्रुपदबाई निमलवाड हिने बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मुलगा दत्ता गणपत निमलवाड व अवघी ४ महिन्यांची मुलगी अनुसया या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली. त्यानंतर ध्रुपदबाई माहेरी गेली. त्यानंतर आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. 

आईने असे कृत्य का केले हे समजू शकले नाही. याबाबत गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ध्रुपदबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील पुढील तपास करीत आहेत.

Web Title: mother kills two childrens in Bhokar; Granma and uncle destroyed the evidence by burning the body