शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दुष्काळातही सोहळे, उत्सवावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:13 AM

दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात.

ठळक मुद्देहदगाव तालुका : २२ गावांत १०० लग्नकर्जबाजारी होवून लग्नात पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रघात

सुनील चौरे।हदगाव : दुष्काळ पडला म्हटले तरी पोटात गोळा उठतो. डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. ज्यांनी १९७२ चा दुष्काळ अनुभवला ते आजही झाडपाला खाऊन दिवस काढल्याच्या आठवणी सांगतात. परंतु, आता दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ झाला असून धार्मिक कार्यक्रम जयंतीवरही लाखोंचा खर्च केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला. यामुळे कोरडवाहू शेतीसह बागायती शेतीतील उत्पन्नाला फटका बसला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीन याची आणेवारी कमी आल्याने जिल्ह्यात मनाठा मंडळाचा समावेश दुष्काळात झाला. यामुळे २०-२२ गावांचा समावेश आहे. निसर्गाची अवकृपा झाल्याने माणूस हतबल होतो. शेती असा व्यवसाय आहे की, नफ्याची खात्री नाहीच. उपवर झालेल्या मुलीच्या लग्नाचीही चिंता कुटुंबाला असते.मुलीच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासून बचत केली जाते. परंतु, सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे फिक्स डिपॉझीट काढण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे. सुगी चांगली येईल या आशेने शेतकरी शेतीवर खर्च करतो. लहरी पावसामुळे, हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी होत आहे. अशाच गावात तीन महिन्यांत शेकडो लग्न होत आहेत.या लग्नात होणा-या खर्चावर कुठेही बारकाई दिसत नाही. फटाके, डेकोरेशन, बँड, स्वयंपाकातील विविध पदार्थ व लग्नाला आमंत्रित होणारे शेकडो नातेवाईक यामुळे खर्च अमाप होतो. यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह मेळावे घेण्यात येतात. तर कुठे सर्वधर्मीय विवाह मेळावेही घेतले जातात. परंतु आजही सामाजिक दडपणामुळे व अहंकारामुळे अनेक मंडळी कर्जबाजारी होऊन लग्नावर खर्च करतात व शेवटी नैराश्यात येतात.

वाढदिवसाचे बॅनर लावून केला जातो खर्च

  • गावात ज्येष्ठ नागरिकांना, निराधारांना पगार नाही. सहाशे रुपये महिना मिळावा यासाठी ही मंडळी एकीकडे पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरताना दिसते तर दुसरीकडे हीच पुढारी मंडळी नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर काढण्यात दंग झालेले दिसतात. दुष्काळग्रस्त गावांत लग्नाचा सुकाळ पाहिल्यानंतर येथे दुष्काळ नाही. कागदावरच हा दुष्काळ आहे़
  • पळसा येथील शेतक-याने शेतातील हरभरा आगीत जळाल्यामुळे मुलीचे ठरलेले लग्न कसे करावे? या विवंचनेतून आत्महत्या केली. २२ गावांतही सध्या पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहेत. एका कार्यक्रमासाठी साधारणत: ५० हजार ते १ लक्ष रुपये खर्च होतो़ दुष्काळ पडल्यामुळे निदान त्यावर्षी खर्च करण्यात येऊ नये. परंतु पुढारी ऐकत नाहीत.
टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळmarriageलग्न