शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

एमसीक्यू प्रश्नपद्धती आता बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:59 AM

स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या ठरावानुसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एमसीक्यू परीक्षा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़

ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठाचा निर्णय यापुढे पदवी परीक्षा थिअरी पद्धतीनुसार घेणार

नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या ठरावानुसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एमसीक्यू परीक्षा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापुढे बी़ ए़, बी़ एस्सी़, बी़ कॉम़, बी़ बी़ ए़ व इतर अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा ही थिअरी पद्धतीने घेण्यात येणार आहे़शैक्षणिक वर्ष २०१९- २० मधील प्रथम, तृतीय व पाचव्या सत्रातील नियमित विद्यार्थ्यांची हिवाळ्यातील परीक्षा तसेच नियमित सत्रांची उन्हाळी २०२० ची परीक्षा थिअरी पॅटर्ननुसार होणार आहे़ बी़ ए़ व बी़ एस्सी़ अभ्यासक्रमातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील ऐच्छिक विषयांच्या दोन्ही पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्रित घेण्यात येणार आहे़दोन्ही पेपरसाठी तीन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे़ प्रत्येक पेपरसाठी २० पानांची स्वतंत्र उत्तरपुस्तिका देण्यात येणार आहे़ बी़ ए़ , बी़ एस्सी़, बी़ कॉम़, बी़ बी़ ए़ व इतर अभ्यासक्रमातील सर्व सत्रातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना थिअरी व एमसीक्यू पॅटर्नप्रमाणे परीक्षा देण्यासाठी हिवाळी २०१९ व उन्हाळी २०२० अशा केवळ दोन संधी देण्यात येणार आहेत़ यानंतर अनुत्तीर्ण राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन परीक्षा पद्धतीनुसार केवळ अनुत्तीर्ण विषयाची परीक्षा द्यावी लागणार आहे़या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेताना सर्व परीक्षा केंद्रप्रमुखांनी बैठक व्यवस्था स्वतंत्र हॉलमध्ये करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ विद्यार्थ्यांना थिअरी पॅटर्नमुळे आता लिहिण्याची सवय लावावी लागणार आहे़हिवाळी परीक्षेपासून सुरूवातच्येणाºया हिवाळी परीक्षेपासून नव्या परीक्षा पद्धतीतील बदलानुसार परीक्षा होणार आहेत़ विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांत यापूर्वी एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्या जात होत्या़ मात्र आता विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तरे लिहावी लागणार आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड