Maratha Kranti Morcha : लोह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:51 IST2018-07-24T16:48:54+5:302018-07-24T16:51:23+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Maratha Kranti Morcha : लोह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद
लोहा (नांदेड ) : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज आठवडी बाजार व पिकविमा भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यावर बंदचा परिणाम जाणवला.
आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले. याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. यानंतर आंदोलकांनी शिवाजी चौकात रास्तारोको केले.
खबरदारीचा उपाय म्हणुन शाळा व महाविद्यालये बंद होती. एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या. आज शहरात आठवडी बाजार होता तसेच पिकविमा भरण्याचा आज अंतिम दिवस होता. यावर बंदच परिणाम जाणवला. पोउपनि असद शेख यांनी शहरभर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.