शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

माहूर तालुक्यात ३४१ जंगली प्राण्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:18 AM

बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्देबोअरची पाणीपातळी खालावतेयटरबूज आले धोक्यातउन्हाचा तडाखा बसतोय टरबुजांना

श्रीक्षेत्र माहूर : बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे.माहूर तालुका हा सह्याद्री पर्वतरागांत मौल्यवान वृक्षांच्या घनदाट जंगलानी व्यापला आहे. तालुक्यात एकूण १३ हजार ६१७.९८१ हेक्टरच्यावर वनक्षेत्र असून मेंडकी, पाचोंदा, मांडवा, गोंडवडसा, माहूर ही पाच वनपरिमंडळ आहेत.तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ७७०.८३ हेक्टर असून त्यापैकी जंगलाखालील क्षेत्र १३ हजार ६१७.९८१ हेक्टरवर सह्याद्री पर्वताच्या रांगेत घनदाट जंगल आहे. हे जंगल अगदीच घनदाट असून यामध्ये बिबट्या, रोही, तडस, अस्वल, रानडुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, हरिण यासह हिंस्त्र पशू-पक्षी जंगली श्वापदे आढळतात. या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे गत दोन महिन्यांपासून जंगलामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात ट्रक्टर, टँकरने पाणीपुरवठा करून जंगली प्राण्यांची तृष्णा भागविण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे. वाढत्या मानवी वस्त्यांमुळे जंगल कमी होत चालले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.सध्या जंगल परिक्षेत्रात किती प्राणी आहेत, कोणत्या प्राण्यांची संख्या जास्त आहे, याचे निरीक्षण करण्यासाठी वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेला नियोजन केले जाते. १७ व १८ मे रोजी जंगल परिक्षेत्रात वनखात्याच्या वतीने प्राण्यांची गणना करण्यात आली आहे.वन्यप्राणी गणनेसाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी वनविभागाच्या २ कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पाठविल्याची वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली.माहूरच्या जंगलात बिबट्याचा वावर असतो. मागील काळात बिबट्याने केलेल्या हल्ल्याची नोंदही वन विभागात सापडते. मात्र बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणीगणनेत बिबट्या मिस झाला. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या गणनेत बिबट्या आढळून न आल्याने जंगलातील एकूण प्राण्यांच्या संख्येत बिबट्याचा उल्लेख आलेला नाही.पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यातील काही भागामध्ये वाघाचा वावर असून ये-जा करण्यासाठी सदरील अभयारण्याचा वापर करीत असल्याचे गृहीत धरून ट्रॅप कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.तालुक्यातील वाढलेली प्राणी व पक्षी यांची संख्या सुरक्षित राहण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माहूर वनविभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे, असेही कवळे पाटील यांनी सांगितले.दरम्यान, माहूर व किनवट तालुक्यातील जंगलातून सागवान लाकडासह अन्य लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. या तस्करीला आळा घातल्यास वन्यप्राण्यांची संख्या आणखी वाढू शकणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.प्राण्यांमध्ये सर्वाधिक नीलगायपाणवठ्यावर रात्री पहारा देऊन पाणी पिण्यासाठी येणाºया प्राण्यांची माहिती वनकर्मचाºयांनी नोंदविली. त्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून जंगल परिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या आकडेवारीचा अंदाज काढण्यात आला आहे. माहूर जंगल परिक्षेत्रात सर्वाधिक आढळणाºया प्राण्यांमध्ये नीलगाय १२९, भेकडी १, वानर ८७, अस्वल १०, रानमांजर २, ससा ८, रानडुक्कर १०४ असे नर, मादी, पिल्ले मिळून एकूण ३४१ वन्यप्राण्यांची गणना झाली़ तर राष्ट्रीय पक्षी असलेले मोर ८८, घुबड ४, बगळे ५९, चिमणी ४५, टिटवी ३०, सुतार पक्षी १, पोपट २०, कावळा ६६ असे एकूण ३१३ पक्ष्यांची गणना करण्यात आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीNatureनिसर्गforestजंगल