शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

माहूरच्या रोपवेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार; नितीन गडकरी यांची शिष्टमंडळाला ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 4:01 PM

प्रस्तावित असलेल्या  रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली.

ठळक मुद्देश्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त आशिष जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली़ माहूर तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित २१६ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे़ त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरीही दिली आहे़

श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना लवकरच रोप-वेवरून जाण्याचा योग येणार आहे. या तीर्थक्षेत्रासाठी प्रस्तावित असलेल्या  रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली.

माहूर तीर्थक्षेत्राच्या विविध मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, यासाठी श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त आशिष जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली़ माहूर तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित २१६ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे़ त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरीही दिली आहे़ पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत़ यात श्री दत्त शिखर, अनुसया माता, रस्ता, श्री दत्त शिखर पायथा ते मंदिर रस्ता, श्री रेणुका देवी मंदिर, श्री अनुसया माता मंदिर, श्री दत्तशिखर मंदिर, सोनपीर बाबा दर्गा, श्री देवदेवेश्वर मंदिर परिसराचा विकास, श्री रेणुकादेवी परिसरातील दोन हेक्टर ६२ आर जागेला संरक्षक भिंत, सभामंडप, स्वच्छतागृह, पाय-या, प्रशासकीय कार्यालय आदी कामांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील ६८ कोटींपैकी आजवर केवळ २ कोटी निधी प्राप्त झाला आहे़ सर्व अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत़ अंदाजपत्रकास मंजुरी देवून तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली़ तसेच भाविकांचा वाढता ओघ पाहता रोप-वेचे कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली़  यावर रोप-वेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली़ तीर्थक्षेत्र विकासकामांना निधी देण्याबाबतची सूचना राज्य शासनाला करणार असल्याचेही त्यांनी विश्वस्तांना सांगितले.

मुख्य दर्शनद्वार लवकरच होणार मोठेश्री रेणुका देवीचे मंदिर पुरातन आहे़ मंदिराचे काम करताना राज्य पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते़ भाविकांना श्री रेणुका देवीचे दर्शन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी देवीच्या गाभा-याचे मुख्य दर्शन द्वार मोठे करण्याची आवश्यकता आहे़ तसे संस्थानने पुरातत्व विभागाला कळविले होते़ पुरातत्व विभागाने त्यांच्या यंत्रणेमार्फत काम करण्यात येईल व अंदाज पत्रकाप्रमाणे १ कोटी २७ लाख रुपये संस्थानने पुरातत्व विभागाकडे वर्ग करावेत असे कळविले होते़ या विषयावरही यावेळी चर्चा झाली़ दर्शन द्वारासाठी सांस्कृतिक मंत्रालय १ कोटी २७ लाख रुपये लवकरच पर्यटन मंत्रालयाकडे वर्ग करणार आहे़ त्यामुळे दर्शन द्वार मोठे करण्याची कार्यवाहीही लवकरच होईल, अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दिली.

टॅग्स :Nandedनांदेड