महिनाभरात महावितरणच्या सहा कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:18 IST2019-03-30T00:16:17+5:302019-03-30T00:18:02+5:30
मार्चअखेर असल्याने महावितरणच्या वतीने वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र या वसुली मोहिमेस गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत

महिनाभरात महावितरणच्या सहा कर्मचाऱ्यांना मारहाण
नांदेड : मार्चअखेर असल्याने महावितरणच्या वतीने वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र या वसुली मोहिमेस गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून महिनाभरात जवळपास सहा अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे़ यास महावितरणकडून चुकीचे आणि अवास्तव बिल देण्याचा रोष अधिक कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे़
अर्धापूर तालुक्यातील मेंढला बुद्रुक येथे २८ मार्च रोजी वीजबिल वसुली करत असताना दत्ता गणपती भरकड याने अर्धापूर शाखेतील तंत्रज्ञ मंगेश बोईनवाड यास शिवीगाळ करत जबर मारहाण केली. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार अर्धापूर शाखा कार्यालयाअंतर्गत येणाºया मेंढला बुद्रुक या गावामध्ये तंत्रज्ञ मंगेश बोईनवाड हे आपल्या दोन सहकारी कर्मचाºयांसोबत २८ मार्च रोजी सकाळी वसुली करत असताना कसली वसुली? कशाची वसुली? असे प्रश्न विचारत दत्ता गणपती भरकड याने मंगेश बोईनवाड यांना मारहाण केली़ वेळीच इतर ग्रामस्थांनी सोडवासोडव केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी अर्धापूर ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मार्च महिन्यात मारहाण झाल्याची ही सहावी घटना आहे.
नांदेड शहरात १४ मार्च रोजी शिवाजीनगर परिसरातील महावितरण कार्यालयात जनमित्र राजरत्न हनुमंते यांना नगरसेवक राजू यन्नम यांच्याकडून मारहाण झाली होती़ तसेच किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे ११ मार्च रोजी शेख आक्रम शेख सरदार या वीज ग्राहकाने वसुली मोहिमेसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता सुरेश गंधे व अन्य दोन लाईनमनला मारहाण केली़
नायगाव उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता महेश गट्टुवार यांना ७ मार्च रोजी मारहाण झाली होती़ सदर घटना घडत असतानादेखील पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करीत नसल्याचे असे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी महावितरण कर्मचारी करीत आहेत़ परंतु, वीजग्राहकांचा रोष कशामुळे बळावत आहे, याचा शोध घेण्याचे कष्ट अधिकारी घ्यायला तयार नाहीत़