शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

Maharashtra Gram Panchayat Election Results: नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 7:39 PM

हदगावचे आ. माधवराव जवळगावकर, नायगावचे आ.राजेश पवार, देगलूरचे आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या गटाला काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला.

ठळक मुद्देजिल्ह्याचे लक्ष असलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली. येथे बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनलचे १७ पैकी १६ जण निवडून आले.

नांदेड - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंतच्या  निकालात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना नाकारल्याचे चित्र स्पष्ष्ट झाले. हदगावचे आ. माधवराव जवळगावकर, नायगावचे आ.राजेश पवार, देगलूरचे आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या गटाला काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला.

देगलूर तालुक्यातील करडखेड येथील विद्यमान सरपंच व भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख यांचे पॅनल पराभूत झाले. त्यांच्या पॅनलला ९ पैकी २ जागा मिळाल्या. अंतापूर ता. देगलूर येथील ग्रा.पं. निवडणुकीत भाजपा कार्यकर्ते हणमंत डोपेवाड यांचे पॅनल विजयी झाले. अंतापूर हे गाव आ.रावसाहेब अंतापूरकर यांचे आहे. येेथे त्यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या. तर डोपेवाड यांच्या पॅनलला चार जागा मिळाल्या. सुगाव ता.देगलूर येथील भाजपा कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मोहिते पाटील यांच्या पॅनलला सर्वच्या सर्व ९ जागा मिळाल्या. काँग्रेस कार्यकर्ते गिरीधर पाटील यांचा येथे पराभव झाला.

हदगाव तालुक्यातील निवघा ग्रामपंचायत बाबुराव कदम आणि माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब कदम यांच्या ताब्यात गेली. त्यांच्या पॅनलचे १५ पैकी १४ जण निवडून आले. शिरड येथील ११ पैकी ८ जागा अनिल पाटील यांच्या पॅनलला, संजय कल्याणकर यांच्या पॅनलला दोन तर देवानंद कल्याणकर यांच्या पॅनलची एक जागा निवडून आली. उंचेगाव बु. ता. हदगाव येथील ग्रामपंचायत देवराव बंडे पॅनलच्या ताब्यात गेली. येेथे बंडे गटाचे ९ पैकी ९ सदस्य निवडून आले. धानोरा रुई येथे ९ पैकी ८ जागा जिंकून लक्ष्मण शिंदे यांच्या पॅनलने वर्चस्व मिळविले. गजानन शिंदे यांच्या पॅनलची एक जागा निवडून आली.

जिल्ह्याचे लक्ष असलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली. येथे बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनलचे १७ पैकी १६ जण निवडून आले. धर्माबाद तालुक्यातील येताळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मावती सतपलवार यांचे वर्चस्व राहिले. त्यांच्या पॅनलने ११ पैकी ११ जागा मिळविल्या. तालुक्यातील अतकूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला. येथे माजी जि.प. सदस्य गंगाधर तोटलोड व शिवसेनेचे पं.स. सभापती मारोती कागेरू यांच्या पॅनलने बाजी मारली. बाभळी ध. ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली. बाबुराव पाटील यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व  सात जागा जिंकल्या.

बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रामपंचायतमध्ये माजी आ. गंगाराम ठक्करवाड यांच्या गटास सात तर अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख यांच्या गटास सहा जागा मिळाल्या. आरळी ग्रा.पं.  निवडणुकीत सदाशिव पाटील बोडके गटाला सात तर ओमप्रकाश पाटील बोडके गटाला सहा जागा मिळाल्या. येथे मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा पराभव झाला.

माहूर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या आसाेली ग्रामपंचायतवर राष्ष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली. येथे राष्ष्ट्रवादीचे ९ पैकी ९ उमेदवार निवडून आले. आष्ष्टा ग्रामपंचायतमध्ये प्रा.राजेंद्र केशवे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रणित पॅनलनेही सर्वच्या सर्व ९ जागा पटकाविल्या. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNandedनांदेडNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना