शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:21 PM

सरकारचा केवळ घोषणांचा सुकाळ

ठळक मुद्देभाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकारच नाही़ 

नांदेड : सर्व महत्त्वाच्या विषयांवर वेळ मारुन नेण्याचे काम करणाऱ्या सरकारने राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे़ भाजप-सेनेला राज्यही नीट चालविता येत नसल्याचेच यावरुन स्पष्ट झाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली़

भोकर मतदारसंघातील आंबेगाव, बारसगाव, कामठा बु़मालेगाव या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या़ यावेळी चव्हाण म्हणाले, येथील जनता तोंड पाहून प्रेम न करता ते मतपेटीद्वारे व्यक्त करते़ या भागातील मतदार शंकरराव चव्हाण असोत की, अशोकराव चव्हाण  यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची नेहमी प्रचिती येते़ आम्हाला बोलू दिले जात नसल्याची खंत तरुणाईने व्यक्त केली होती़ त्यामुळे युवा संवाद कार्यक्रम घेवून तरुणाईला मोकळेपणाने आपल्या समस्या मांडण्याची संधी दिली़ तरुणांनाही हे राज्य, देश सांभाळायचे आहे़ त्यामुळे जुन्या माणसांना सांभाळा, गाव तुम्हालाच सांभाळून घ्यायचे आहे़ आजचे भाजप-सेना सरकार केवळ खोटे बोलून वेळ मारुन नेत आहे़ २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केली़ परंतु अद्यापही त्याचा मागमूस नाही़ सत्तेत आल्यानंतर मात्र काँग्रेस सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली़

भाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकारच नाही़ शेतकरी त्रस्त, बेरोजगारीत वाढ, कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही, महिलांचे प्रश्न ‘जैसे थे’, रस्त्यांची दुरवस्था असताना सरकारकडून  धादांत खोटा प्रचार केला जात आहे़ तूर खरेदी करणे अन् त्याचे पैसे देण्याचे काम सरकारचे़ त्यात मी जबाबदार कसा? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला़ परंतु केवळ कलम ३७० च्या नावाने ढोल बडविण्याचे काम सुरु आहे़ ३७० मुळे तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला का? संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही़ त्या लाभार्थ्यांचे पाप भाजप-सेना सरकारला लागणार आहे, असेही चव्हाण म्हणाले़

यावेळी बालाजी गव्हाणे, संजय लहानकर, पप्पू कोंडेकर, अमोल डोंगरे, श्याम टेकाळे, संतोष गव्हाणे, गोविंद मुसळे, उद्धवराव राजेगोरे, बाळासाहेब मुसळे, गणेश बोंडारे, मदन देशमुख, रणजित मुसळे, उत्तमराव कल्याणकर, विरभद्र नांदेडकर यांनी मनोगत व्यक्त केले़ व्यासपीठावर बाळासाहेब डोंगरे, रमेश नांदेडकर, शिवानंद शिप्परकर यांची उपस्थिती होती़ 

वाढप्या आपला असावा लागतोबाहेरचा म्हणजेच आयात केलेला उमेदवार विकासकामे किती करणार?  त्यासाठी वाढप्या आपला असावा लागतो़ अशोकराव चव्हाण यांनी न मागता आंबेगाव परिसरात विकासकामे केली़ गेल्या पाच वर्षांत सरकारने केवळ थापा मारल्या़ अशोकरावांची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडली गेली आहे़ भाजप-सेनेला तोंड दाखविण्यासाठी जागा उरली नाही़ त्यामुळे मूळ प्रश्नांना ते बगल देत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली़  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokar-acभोकरNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण