सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 10:06 IST2023-10-12T10:05:30+5:302023-10-12T10:06:15+5:30

आता सावकराला पैसे देण्यासाठी पाच किडन्या विकायच्या आहेत, अशी जाहिरात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर डकवली आहे.

Lender's molestation Five kidney to sell | सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे!

सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे!

नांदेड : कोरोनाकाळात सावकाराकडून दोन लाख घेतले. त्यापेक्षा अधिक पैसे देऊनही जाच वाढतच गेला. त्यामुळे त्यांनी गाव सोडले. आता सावकराला पैसे देण्यासाठी पाच किडन्या विकायच्या आहेत, अशी जाहिरात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर डकवली आहे.

मुदखेड तालुक्यातील वाईवरदड या गावातील हे कुटुंब आहे. जाचामुळे त्यांनी मुंबई गाठली. आम्हाला आता गावी जाऊन शेती करायची आहे. सावकार मागेल तेवढे पैसे द्यायचे आहेत. पाच मुलांपैकी ज्याची किडनी कुणाला फिट बसत असेल तर ती विकायची आहे, असे महिलेने म्हटले.
 

Web Title: Lender's molestation Five kidney to sell