शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१८० दलघमीची तरतूद करून लेंडी प्रकल्पाला सुधारित मान्यतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:17 IST

महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त उपक्रम म्हणून लेंडी प्रकल्पाकडे पाहिले जाते.

नांदेड : महाराष्ट्रतेलंगणा राज्याचा संयुक्त उपक्रम म्हणून लेंडी प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र या प्रकल्पातही खोडा घालण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरु आहे. २००९ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पासाठी १८० दलघमी येवा मान्य करुन या प्रकल्पास सुधारित मान्यता द्यावी. तसेच जल आराखड्यात १८० दलघमी पाण्याची तरतूद करावी, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली आहे.

लेंडी प्रकल्प महाराष्ट्र  आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना सिंचन देणारा प्रकल्प आहे. १९८६ मध्ये शंकरराव चव्हाण पुढाकारातून १८० दलघमी पाणी वापरासाठी हा प्रकल्प पुढे आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १५ हजार ७१० हेक्टर आणि तेलंगणातील ११ हजार २१४ हेक्टर सिंचित होणार आहे. मूळ प्रस्तावानुसार महाराष्ट्राने प्रकल्पासाठी ६२ टक्के खर्च करायचा आहे. तर उर्वरित ३८ टक्के खर्च आता तेलंगणा करणार आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले असून कालव्यांची कामेही सुमारे ७५ टक्के पूर्ण झाली आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व जमीनही अधिग्रहित करण्यात आली असून केवळ ३ टक्के गावठाणाच्या पुनर्वसनाचे काम शिल्लक आहे.

१९८६ पासून या प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच पुनर्वसनाच्या अनुषंगाने काही वाद निर्माण झाल्याने प्रकल्प पूर्णत्वासाठी विलंब झाला. सद्य:स्थितीत सुमारे ५०० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. या प्रकल्पात १८० दलघमी येवा २००९ च्या प्रस्तावानुसार मान्य करण्यात आला आहे. मात्र पुन्हा नव्याने या प्रकल्पाचा अभ्यास करण्याचे तसेच प्रमाणपत्र घेण्याबाबतचा आग्रह केला जात आहे. हा प्रकार या प्रकल्पात खोडा घालणारा असल्याची टीका करीत प्रकल्पास तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी. तसेच जल आराखड्यात १८० दलघमी पाण्याची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच भोकर तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवावी, पिंपळगाव, दिवशी, पाकी व जाकापूर या प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करुन द्यावे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या  कालवा दुरुस्तीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्याची मागणी खा. चव्हाण यांनी केली आहे.

ग्रीड पद्धतीचे वेगळे आरक्षण नकोउर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ५.३१ टीएमसी पाणी बिगरसिंचन प्रयोजनासाठी आरक्षित केले जाते. त्यामुळे मराठवाड्यात ग्रीड पद्धतीने इसापूर धरणातून ५.२९ टीएमसी पाणी आरक्षित केल्यास ते शेती सिंचनासाठी मिळणार नाही. पर्यायाने या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या पाण्यावर वेगळ्या ग्रीड पद्धतीने आरक्षण लावू नका, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणLendi Lakeलेंडी तलावWaterपाणीTelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र