शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाची पिके 'कोमात'

By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST

नांदेड : जिल्ह्यात जवळपास दीड लाख एकर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले असून पाण्याअभावी पिकांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़

नांदेड : जिल्ह्यात जवळपास दीड लाख एकर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले असून पाण्याअभावी पिकांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़ त्यामुळे खरीपातील पिकांची अवस्था 'कोमात' गेल्यासारखी झाली आहे़ त्याचा फटका आता उत्पादनावर होणार आहे़ पावसाने दडी मारल्याने सर्वाधिक फटका कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाची अवकृपा होत असून यावर्षी त्यात मोठी भर पडली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस लांबला त्यामुळे त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. शेतकऱ्यांचे हातचे सोयाबीन, मूग, उडिद पीकही गेले़ कोरडवाहू शेतकरी चिंतेत- जिल्ह्यात पावसाअभावी जून-जुलै, आॅगस्ट महिनाही कोरडा जात असल्याने आजपर्यंत पडलेल्या तुरळक सरी वगळता वरुणराजाने हजेरी न लावल्याने कोरडवाहू शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र मोठे असल्यामुळे सिंचनाच्या सोईसुविधाही अल्प प्रमाणात आहेत. अशात बागायत शेतीलाही पाणी देण्यासाठी भारनियमनाचा फटका बसत आहे. पावसाची दडी व पेरण्यांना झालेला उशिर यामुळे पिकांची वाढही खूंटली आहे. परिणामी पीके कोमेजली़ खरीप हंगामही हातचा जाण्याची आता चिंता आहे़ (प्रतिनिधी)कोरड्या दुष्काळाचे सावटजिल्ह्यात जुन ते आॅक्टोबर दरम्यान एकूण १५२८८.७६ मि.मी. तर सरासरी ९५५.५५ मि.मी.पाऊस पडतो. परंतु यंदा १९ आॅगस्टपर्यंत एकूण २६४२.९४ मि.मी. तर सरासरी १६५.१८ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. तर गतवर्षी १९ आॅगस्टपर्यंत एकूण १३४११.४७ मि.मी. तर सरासरी ८३८.९२ मि.मी.एवढा पाऊस पडला होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढावले आहे.