हिमायतनगर पशू वैद्यकीय दवाखान्यानी सोडली कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST2021-02-21T04:34:10+5:302021-02-21T04:34:10+5:30
शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी डॉ.उमेश बालाजी सोनटक्के यांनी स्वखर्चाने पशुवैद्यकीय दवाखान्याचे सर्व चित्रच बदलून टाकले. येथिल सर्व ...

हिमायतनगर पशू वैद्यकीय दवाखान्यानी सोडली कात
शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी डॉ.उमेश बालाजी सोनटक्के यांनी स्वखर्चाने पशुवैद्यकीय दवाखान्याचे सर्व चित्रच बदलून टाकले. येथिल सर्व परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून परीसर हिरवागार केला. यात सुगंधित फुलाचे झाले,फळाचे झाडे लावली इमारत रंगरंगोटी करून भिंतीवर भ चित्र रेखाटले. पशू वैद्यकीय अधिकारी बालाजी सोनटक्के यांच्या श्रमदानातून झालेले आहे.
हिमायतनगरात ठिक ठिकाणी शिवजयंती उत्सवात साजरी
हिमायतनगर -शहरात ,ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठिक ठिकाणी साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील परमेश्वर मंदीर सभागृहात छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरीकांची उपस्थिती होती.
सरसम,करंजी,सोनारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवरील पाटीचे अनावर करण्यात आले. शहरातील काँग्रेस कार्यालयात शिव जयंती निमित्त आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते पुजा करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ता.अध्यक्ष विकास पाटील,सुभाष राठोड,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश वानखेडे,गोविंद बंडेवार,संजय माने,अॅड. अतूल वानखेडे, आदीसह अनेकांची उपस्थिती होती.शहरातील परमेश्वर मंदीरात सार्वजनिक शिव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवराची शिवाजी महाराज याच्या इतिहासवर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. यावेळी डाॅ राजेंद्र वानखडे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे,माजी.नगराध्यक्ष कूनाल राठोड, डाॅ गणेश कदम डाॅ वानखडे, भाजपा तालुकाध्यक्ष आषिस सकवान,राम सुर्यवंशी,सचिन माने, शंकर पाटील, गोविंद शिंदे गजानन हरडपकर , सुभाष शिंदे, राम नरवाडे ,विलास वानखडे, खडू चव्हाण, शाम ढगे, दिलीप शिंदे, संतोष साबळकर , श्रीकांत सुर्यवंशी आदी उपस्थि होते.