किनवट (जि. नांदेड): नात्यांमधील ओलावा आणि कर्तव्यभावना संपत चालल्याच्या तक्रारी होत असतानाच, किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील एका ऑटोरिक्षा चालक तरुणाने समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. आपल्या दिवंगत भावाच्या मुलांचे भविष्य अंधारात जाऊ नये आणि वहिनीला सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रफुल्ल पाटील या तरुणाने आपल्या वहिनीशी विवाह करून पोरक्या झालेल्या संसाराला आधार दिला आहे.
कुटुंबावर कोसळला होता दुःखाचा डोंगरवझरा येथील अष्टपाल पाटील यांचे फेब्रुवारी २०२६ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विजयालक्ष्मी, एक ८ वर्षांची मुलगी आणि एक ६ वर्षांचा अंध मुलगा असा परिवार निराधार झाला होता. पित्याचे छत्र हरवल्याने या लहानग्यांचे संगोपन आणि पत्नीचा उदरनिर्वाह कसा होणार, असा गंभीर प्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकला होता.
दिराचा धाडसी निर्णय अन् माणुसकीचे दर्शनकुटुंबाची ही दयनीय अवस्था पाहून धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील याने केवळ सहानुभूती न दाखवता एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याने आपल्या वहिनीला (विजयालक्ष्मी) जीवनसाथी म्हणून स्वीकारून, आपल्या पुतण्या आणि पुतणीच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. "भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत आणि वहिनीला सन्मानाने जगता यावे, हाच या विवाहामागचा मुख्य उद्देश आहे," अशा भावना प्रफुल्लने व्यक्त केल्या. व्यवसायाने ऑटोरिक्षा चालक असलेल्या प्रफुल्लच्या या त्यागाचे आणि मोठेपणाचे वझरा ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
Web Summary : In a selfless act, an auto-rickshaw driver married his brother's widow, providing a home and future for her children, including a blind son, after the brother's untimely death. This act of compassion has been widely praised.
Web Summary : एक निस्वार्थ कार्य में, एक ऑटो-रिक्शा चालक ने अपने भाई की विधवा से शादी की, उसके बच्चों, जिनमें एक अंधा बेटा भी शामिल है, के लिए घर और भविष्य प्रदान किया, भाई की असामयिक मृत्यु के बाद। इस दयालुता की व्यापक रूप से सराहना की गई है।