शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कंधार तालुक्यात ८५६ जलस्त्रोतांची अ‍ॅपद्वारे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:29 IST

मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अ‍ॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे.

प्रा. डॉ. गंगाधर तोगरे।कंधार : मान्सूनपश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे मोबाईल अ‍ॅपद्धारे नमुने संकलित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यात ९४९ पैकी ८५६ पाणीनमुने गोळा झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सरासरी काम २० जानेवारीपर्यंत ८१.६६ टक्के झाले आहे. तर कंधार तालुक्याचे काम ९०.२० टक्के झाले आहे. संकलित पाणीनमुने तपासणीअंती पिण्यास योग्य की अयोग्य, याचे वास्तव उलगडणार आहे.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार जि. प. ही जिल्ह्याभर मोहीम राबवित आहे. कंधार तालुकास्तरावर ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या योजना व स्त्रोतांची रासायनिक तपासणीसाठी मोबाईल अ‍ॅपद्धारे पाणीनमुने गोळा करण्यात येत आहेत. १० आॅक्टो २०१८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत गावे, वाडी, तांडे आदी भागात जाऊन पाणीनमुने संकलित करण्यात आले. पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रमात तालुक्याचे ९४९ चे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ८५६ साध्य झाले. शंभर टक्के दिलेले उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात अवघे ९३ शिल्लक स्त्रोतांचे रासायनिक तपासणी नमुने घेऊन १०० टक्के साध्य केले जाणार आहे.हा कार्यक्रम नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणीस्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते आणि शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के, तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले. गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस. एम. अली यांच्या सूचनेनुसार पाणी नमुने गोळा केले जात आहेत.तालुक्यातील आलेगाव येथील १३ पाणीनमुने संकलित करण्यात आले. आंबुलगा १५, औराळ ६, बाबूळगाव ६, बाचोटी ९, बहाद्दरपुरा १२, बाळांतवाडी व बामणी प्रत्येकी ४, बारूळ १९, भेंडेवाडी ५, भंडारकुमठ्याची वाडी ७, भोजूची वाडी २, भूकमारी १, भुत्याची वाडी ५, बोळका ८, चिखलभोसी १०, चिखली ७, चिंचोली प.क.१२, दहीकंळबा ९, दाताळा ७, दिग्रस बु़ १४, दिग्रस खु़ १३, गौळ १७, घोडज ७, गोणार ५, गुलाबवाडी ६, गुंडा ८, गुंटूर १०, हाळदा १५, इमामवाडी ६, कळका ८, कल्हाळी ६, काटकंळबा १३, कौठा ४४, कोटबाजार ११, कुरूळा २२, लालवाडी व मादाळी प्रत्येकी ७, मानसपुरी ८, नागलगाव ८, नवघरवाडी ७, उस्माननगर १५, पानभोसी १६ ,पांगरा १४ ,पानशेवडी १०, पेठवडज १९, फुलवळ २४ , राऊतखेडा ८, रूई ९, संगमवाडी ७ , शेकापूर १२ , शेल्लाळी ७, शिराढोण १३, तळ्याचीवाडी १०, तेलूर ८ , उमरज ५, वहाद १२, वाखरड १२, वंजारवाडी ७, येलूर ९ आदीसह सर्व गावचे पाणी नमुने संकलित करण्यात येत आहेत. हे नमुने तपासणीस पाठवून आणि त्यानंतर योग्य की अयोग्य, याचा उलगडा होईल. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरतो. किती पाणीनमुने अयोग्य आहेत, हे समजण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा यत्रंणेतील तांत्रिक दोष, पाणी स्त्रोत देखभाल व दुरूस्तीअभावी आदीमुळे पाणी दूषित होते. पाण्याजवळील घाण यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असतो. अशामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पाणीनमुने तपासणी करून ते पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित केले जाते.
  • पिण्यास योग्य की अयोग्य हे निश्चित शुद्ध पाणीपुरवठा केला केला जातो. पं. स. व तालुका आरोग्य विभागाने यासाठी समन्वयाने काम केले जात आहे. जिल्ह्यात ११ हजार २९० चे उद्दिष्ट होते. परंतु, ९ हजार २१९ फोटो अपलोड झाले. अर्धापूर १०० टक्के, उमरी १०० टक्के तर कंधार ९० .२० टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
  • गटविकास अधिकारी कैलास बळवंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार अधिकारी अशोक सोनकांबळे, एस.एम.अली यांच्या सूचनेनुसार पाणीनमुने गोळा केले जात आहेत.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई