धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला

By अविनाश पाईकराव | Updated: January 6, 2024 15:17 IST2024-01-06T15:14:07+5:302024-01-06T15:17:47+5:30

नांदेड शहरातील हिंगोली गेट भागातील घटना

In Nanded dhaba labor killed with sharp weapon, face burnt to avoid identification | धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला

धाब्यावरील कामगाराचा धारदार शस्त्राने खून, ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला

नांदेड: शहरातील हिंगोली गेट परिसरात एका २६ वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने खून करून, त्याचा चेहरा जाळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.विकास यशवंत राऊत (२६, रा.उमरखेड)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

विकास राऊत एका धाब्यावर कामगार होता. शुक्रवारी रात्री त्या कोणीतरी अज्ञाताने धारधार शस्त्राने खून केला. तसेच चेहरा ओळखू येवू नये यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट देवून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठविले.

याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुत्तेपवाड हे करीत आहेत.

Web Title: In Nanded dhaba labor killed with sharp weapon, face burnt to avoid identification