प्रवाशांसाठी महत्वाचे; नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:36 IST2025-06-13T19:36:17+5:302025-06-13T19:36:29+5:30

या रेल्वेचा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे

Important for passengers: New weekly express to start from Nanded to Ferozepur | प्रवाशांसाठी महत्वाचे; नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होणार

प्रवाशांसाठी महत्वाचे; नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होणार

नांदेड : उत्तर रेल्वेने फिरोजपूर कॅन्ट जंक्शन ते हजूर साहिब नांदेड ही नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या रेल्वेचा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून इतर गाड्यांवरील ताण कमी होणार आहे.

ही गाडी फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथून १३ जून रोजी दुपारी १.२५ वाजता सुटेल आणि फरीदकोट, कोट कपुरा जंक्शन, भटिंडा जंक्शन, दिल्ली-सफदरजंग, भोपाळ, इटारसी जं., खांडवा, मनमाड जं., औरंगाबाद, पूर्णा जं. मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे रविवार पहाटे ३.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून १५ जून रोजी ११.५० वाजता सुटेल आणि पूर्णा जं., औरंगाबाद, मनमाड जं., भुसावळ जं., दिल्ली-सफदर जंग, फरीदकोट मार्गे फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथे मंगळवारी पहाटे ४:३० वाजता पोहोचेल. या साप्ताहिक गाडीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानाकुलीत, द्वितीय शय्या आणि जनरल असे २२ डब्बे असतील.

Web Title: Important for passengers: New weekly express to start from Nanded to Ferozepur