किनवट (जि. नांदेड): राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असताना किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील परीक्षा केंद्रावर 'कॉपी'चा एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. चक्क लाऊडस्पीकर (भोंगा) लावून बारावीच्या जीवशास्त्राच्या (Biology) पेपरची उत्तरे अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्यांना ओरडून सांगितली. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका प्रकार काय?दहेली तांडा येथील स्व. संगीता देवी उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा येथे बुधवारी दुपारी जीवशास्त्राचा पेपर सुरू होता. याच वेळी केंद्राजवळील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर एका अज्ञात व्यक्तीने भोंगा लावला आणि त्याद्वारे वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगण्यास सुरुवात केली. ऐन परीक्षेच्या वेळी भोंग्याचा आवाज घुमल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आणि कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला.
पोलिसांकडून भोंगा जप्त, आरोपी फरारया घटनेची माहिती मिळताच केंद्र संचालक सुबोध थोरात यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून भोंगा जप्त केला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले कॉपीमुक्त परीक्षेसाठी परिश्रम घेत असताना, परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त नव्हता का? असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. पोहेकॉ कोंडापलकुलवार या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी अद्याप फरार आहे.
Web Summary : During a 12th-grade biology exam in Nanded, answers were brazenly broadcasted over a loudspeaker. Police seized the loudspeaker and filed a case against an unknown suspect. The incident raises serious concerns about exam security and administrative negligence, sparking outrage among parents.
Web Summary : नांदेड़ में 12वीं की जीव विज्ञान की परीक्षा के दौरान, खुलेआम लाउडस्पीकर पर उत्तर बताए गए। पुलिस ने लाउडस्पीकर जब्त कर अज्ञात संदिग्ध के खिलाफ मामला दर्ज किया। घटना परीक्षा सुरक्षा और प्रशासनिक लापरवाही पर गंभीर सवाल उठाती है, जिससे अभिभावकों में आक्रोश है।