मांडवी (जि.नांदेड) : महानगरपालिका निवडणूक बंदोबस्त आटोपून चंद्रपूरकडे निघालेल्या समादेशक (होमगार्ड) च्या वाहनाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उनकेश्वरजवळ रस्ता अपघात झाला. या अपघातात ४२ होमगार्ड जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.
पाय तुटलेल्या एका गंभीर होमगार्डला यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी (बा.) येथे जखमी होमगार्डवर उपचार करण्यात आले. पुणे येथे निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले ५० होमगार्ड हे खासगी वाहन क्रमांक एम.एच.०३ सी.पी. -३२७९ मधून चंद्रपूरकडे निघाले होते. उनकेश्वरजवळ हे वाहन पलटी झाले. त्यात सूरज सुभाष गेडाम (वय ३५) रा. परोटी जि. चंद्रपूर यांचा पाय तुटल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. तर अन्य ४२ जखमींवर प्रा.आ. केंद्र उमरी (बा.) येथे डॉ. रेखा खरजुले, रवी राठोड, एम.एस. ढगे, एम.के. वैरागडे, एस.डी. डोगरे, संघर्ष मेश्राम यांनी उपचार केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे, रामकृष्ण मळघणे, सपोनी गंगाधर गायकवाड, मनीष ठाकरे, यदोजी पिसाळ, श्याम माने यांनी भेट दिली आहे.
Web Summary : A vehicle carrying Home Guards returning from election duty overturned near Unkeshwar, Nanded, injuring 42. One person sustained serious injuries and was moved to Yavatmal. The accident involved a private vehicle transporting 50 Home Guards from Pune to Chandrapur. Police are investigating.
Web Summary : चुनाव ड्यूटी से लौट रहे होमगार्डों का वाहन नांदेड़ के उणकेश्वर के पास पलटा, 42 घायल। एक गंभीर रूप से घायल, यवतमाल भेजा गया। पुणे से चंद्रपुर जा रहे 50 होमगार्ड निजी वाहन में थे। पुलिस जांच कर रही है।