Gross Maratha Community Front | सकल मराठा समाजाचा मोर्चा
सकल मराठा समाजाचा मोर्चा

ठळक मुद्देवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावा

नांदेड : खोट्या आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि वैद्यकीय पदव्युत्तर मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून घेण्यात यावा यासाठी १५ मे रोजी नांदेड येथे महात्मा फुले पुतळा(आय टी आय)चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मराठा आरक्षण बचाव रॅली काढुन निवेदन देण्यात आले.
आम्ही न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी नामवंत वकिलांची फौज उभी करू म्हणून लोकसभेची निवडणुक काढुन नेत अक्षरश: मराठा समाजाच्या पदरात आश्वासनाची घैरात टाकणाºया या सरकारने पुन्हा एकदा समाजाची घोर फसवणुक केल्याचं आखा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. कारण २५० पदयुतर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर आणुन प्रवेश मिळाल्यानंतर त्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्या भविष्या सोबत खेळ करणास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे़ नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतर तोच निकाल सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिला़ तेव्हा सरकार नी आपली भुमिका न्यायालयात काय मांडली असेल, याच्यावर सुद्धा आता प्रश्न चिन्ह निर्माण होतायत. ज्या सरकारने मराठा आरक्षण आम्हीच दिलं म्हणुन मिठाई वाटप करत जोर जोरात स्वागत केलं तेच सरकार आज मात्र आचार संहितेच कारण पुढे करून २५० वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करत असल्याची टीका निवेदनाद्वारे केली आहे़
निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व वैद्यकीय मंत्री यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, एसईबीसी अ‍ॅक्ट १६ हा अतिशय घातक स्वरूपाचा असुन त्याच अ‍ॅक्टचा आधार घेत कोर्टाने या २५० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया कालबाह्य केली़
परंतु त्याच एसईबीसी अ‍ॅक्टर १७(१) नुसार जर का महाराष्ट्र शासनाने विचार केला तर नक्कीच या प्रवेश प्रक्रिया पुन:श्च सुरळीत होऊन ह्या २५० पदयुतर वैद्यकीय विद्यार्थ्यांना न्याय मिळु शकतो़ त्यासाठी फक्त सरकारची मानसिकता हवी आहे. करिता हा सामान्य मराठा समाजाचा आवाज सरकार दरबारी पोहचण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारांचे डॉक्टर विद्यार्थ्यांसह सकल मराठा समाजाचे शेकडो समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रितसर निवेदन दिले. या वेळी शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
मोर्चात शेकडो समाजबांधवांचा सहभाग
मोर्चात डॉ़ संजय कदम, डॉ़ सुनील कदम, डॉ़ संभाजी कदम, डॉ़ रेखा पाटील चव्हाण, डॉ़ विद्या पाटील, डॉ़ सुप्रिया गाडेगावकर, डॉ़ भारती, मढवई, सारीका इंगळे, द्वारका उबाळे, छाया शिरफुले, डॉ़ सुचिता बागल, मिनाक्षी पाटील, सावित्री जवळेकर, धनंजय सूर्यवंशी, संगमेश्वर लांडगे, श्याम वडजे पाटील, स्वप्नील जाधव, कपिल जाधव, अविनाश कदम, साई चिंचाळे, अमोल ढगे, संतोष पाटील शिंदे, वर्षा देशमुख, सुशीला सूर्यवंशी आदी़


Web Title: Gross Maratha Community Front
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.