नांदेडात गँगवार पेटले, खून का बदला खून... तिहेरी हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:34 IST2026-04-04T09:33:59+5:302026-04-04T09:34:38+5:30

हत्याकांडातील मृतांना शासकीय रुग्णालयात नेले असता तेथेही हल्ला चढवत एकाची हत्या.

gang war broke out in nanded triple murder | नांदेडात गँगवार पेटले, खून का बदला खून... तिहेरी हत्याकांड

नांदेडात गँगवार पेटले, खून का बदला खून... तिहेरी हत्याकांड

अविनाश चमकुरे, नांदेड: शहरातील डी मार्ट रस्त्यावर शुक्रवारी उत्तररात्री दोन गँग समोरासमोर येऊन उडालेल्या चकमकीत दोघेजण जागीच ठार तर खुनाचा बदला घेत शासकीय रुग्णालयात एकाचा भोसकून खून करण्यात आला. यापैकी एक मृत नुकत्याच पार पडलेल्या नांदेड महापालिका निवडणुकीतील उमेदवार आहे. 

सदा गँग व साई लाला गँग यांच्यात अनेक वर्षापासून वितूष्ट आहे. दरम्यान, अर्जित सिंग उर्फ अजय सिंग व शहाबाज यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झाले होते. शुक्रवारी रात्री अर्जित व त्याचे मित्र सिनेमा पाहून परतत असताना त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेला शहाबाज व त्याच्या साथीदारांनी त्यांना गाठले. एकमेकावर झालेल्या हल्ल्यात अर्जित सिंग व शहाबाज हे दोघेही जागीच ठार झाले.

पोलिसांनी त्यांना विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल केले असता अर्जितच्या भावाने तेथे हल्ला चढवत अरबाज यास ठार केले. शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात झालेल्या मर्डरने कायदा सुव्यवस्थेची लक्तरे टांगली गेली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. घटनास्थळावरून तीन दुचाकी, खंजर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भाग्यनगर ठाणे, स्थानिक गुन्हा शाखा, फॉरेन्सिक व श्वान पथकदेखील दाखल झाले आहे.

Web Title : नांदेड में गैंगवार: तिहरा हत्याकांड, खून का बदला खून

Web Summary : नांदेड में गैंगवार में तीन की मौत। डी-मार्ट के पास प्रतिद्वंद्वी गुटों में झड़प, जिसके परिणामस्वरूप दो की तत्काल मौत हो गई। अस्पताल में जवाबी हमले में एक और की जान चली गई, जिससे डर फैल गया और पुलिस जांच शुरू हो गई।

Web Title : Nanded Gang War Erupts: Triple Murder, Blood for Blood

Web Summary : Gang war in Nanded leaves three dead. Rival gangs clashed near D-Mart, resulting in two immediate deaths. Revenge attack at hospital claims another life, sparking fear and prompting police investigation.