शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:50 IST

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली.

ठळक मुद्देइसापूरच्या पाण्याचा प्रश्न माजी मंत्री गावंडे यांनी घेतली अधीक्षकांची भेट

नांदेड : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. यावेळी अधिका-यांना धारेवर धरत शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे़इसापूरचे पाणी पैनगंगेत सोडण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ त्यानंतर पाच दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ मंगळवारी या भागातील शेतकºयांचे शिष्टमंडळ माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या नेतृत्त्वात अधिक्षक अभियंत्यांना भेटले. पैनगंगा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी सोडण्यासाठी ४० दलघमी पाणी आरक्षीत करावे़ त्यानंतर टप्या-टप्याने ते सोडून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरु ठेवावा, डाव्या कालव्याची त्यावरील नहर व पाटचाºयाच्या अस्तरीकरणाचे अपूर्ण काम पूर्ण करुन या कामासाठी त्वरीत २० कोटी रुपयांचा निधी वर्ग करावा, डाव्या कालव्याचे पाण्यावर होणारा सिंचनाचा अनुशेष भरुन काढावा़ कयाधू शाखा कालव्याचे पूनरुज्जीवन करुन हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नहराचे काम पूर्ण करावे, हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १२ नळयोजना चालू ठेवण्यासाठी नदीमध्ये नियमित पाण्याचा प्रवाह चालू ठेवावा, कालवा समितीच्या होणाºया बैठका इसापूर धरणावर घ्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या़इसापूर निर्मितीनंतर पैनगंगेवर १२ लघुपाटबंधारे प्रकल्प तयार करण्यात आले नसल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याचे अधिकारी सांगतात. पाण्याचे योग्य नियोजन करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पैनगंगा व कयाधूचे पाणी अडवण्यासाठी वेगळा प्रकल्प तयार केल्यास अधिकचे पाणी उपलब्ध होवू शकेल. तशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचे गावंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्ता गंगासागर, चक्रधर पाटील, शंकर तालंगकर, तुकाराम माने, अरविंद माने, भागवत देवसरकर, अविनाश खंदारे, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.चा-यांच्या देखभाल अन् दुरुस्तीकडे दुर्लक्षइसापूर प्रकल्पाअंतर्गत असलेली जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी १७७ चा-या व कॅनाल तयार करण्यात आले. परंतु गत चाळीस वर्षात या चा-या अथवा कॅनालमधून एकदाही पाणी प्रवाहीत झाले नाही. कॅनॉलची उंची व उतार बरोबर नसल्याने धरणाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. देखभाल व दुरुस्तीअभावी चाºयांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मागण्या रेटल्या असत्या तर त्या केव्हाच पूर्ण झाल्या असत्या असा आरोप गावंडे यांनी केला.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाईDamधरण