नांदेडमध्ये माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला अपघात
By श्रीनिवास भोसले | Updated: November 5, 2022 19:45 IST2022-11-05T19:45:01+5:302022-11-05T19:45:56+5:30
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील टोलनाक्या जवळ झाला अपघात

नांदेडमध्ये माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला अपघात
नांदेड : काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला नांदेडमध्येअपघात झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी बिलोली टोलनाक्याजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून नसीम खान यांना किरकोळ दुखपात झाली आहे.
भारत जोडो यात्रेसाठी नसीम खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील टोलनाक्या जवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाने नसीम खान यांच्या गाडीला धडक दिली. त्यात त्याच्या गाडीचे समोरच्या बाजूने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर बिलोली येथील खासगी रुग्णालयात प्रथमोचार करून नसीम खान यांना दुसऱ्या गाडीने नांदेडकडे रवाना करण्यात आले आहे.