शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

नांदेड जिल्ह्यात आगीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:23 IST

जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मारतळा येथे आगीच्या घटनेमुळे पाच दुकाने जळून खाक झाली़ ही आग आटोक्यात येते न येते तोच रात्री एक वाजता नांदेड शहरातील राजेशनगर आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजता कापूस संशोधन केंद्राजवळ आगीच्या घटना घडल्या़ सलग घडलेल्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच दमछाक झाली़

ठळक मुद्देमारतळ्यात पाच दुकाने खाक : नांदेडमध्येही तीन ठिकाणी आग

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड/ मारतळा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मारतळा येथे आगीच्या घटनेमुळे पाच दुकाने जळून खाक झाली़ ही आग आटोक्यात येते न येते तोच रात्री एक वाजता नांदेड शहरातील राजेशनगर आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजता कापूस संशोधन केंद्राजवळ आगीच्या घटना घडल्या़ सलग घडलेल्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच दमछाक झाली़मारतळा येथे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने खाक झाल्याची घटना घडली़ त्यात बी-बियाणे, औषधी, स्टील भांडी, प्लास्टिक टाक्या व साहित्य, पादत्राणे, स्वीट हाऊस व रसवंतीगृहातील फर्निचर जळून लाखोंचे नुकसान झाले़ आग विझविण्यासाठी नांदेड येथून दोन अग्निशमन बंब बोलाविण्यात आले होते़ यावेळी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत तीन तासानंतर आग आटोक्यात आणली़ कापसी रोडलगत असलेल्या मार्केटमधील बसवेश्वर पंढरी आडकिणे भूकमारीकर यांच्या भांडी स्टोअरला शॉर्टसर्किटने आग लागली होती़ त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण करत नजीकची पाच दुकाने आपल्या कवेत घेतली़त्यात रवी अंबादास देशमुख उमाटवाडीकर यांचे रसवंतीगृह, मारुती भीमराव मुंके यांचे बी-बियाणे, औषधी दुकान, राज पुरोहित यांचे आंबे स्वीट हाऊस आणि भास्कर व्यंकटी ढगे वजीरगावकर यांचे एस़ के़ फुटवेअर यांच्या दुकानांचा समावेश आहे़ यावेळी गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता़ ग्रामस्थ व उस्माननगर पोलिसांनी प्रयत्न करीत दोन बंबाद्वारे मध्यरात्री दीड वाजता आग आटोक्यात आणली़ मात्र या आगीत पाच दुकानातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते़मारतळा येथे अग्निशमनचे अधिकारी आग विझवत असताना नांदेड शहरात मध्यरात्री एक वाजता राजेशनगर येथील शेतकरी चौकात (एम़एच़२६, एडी़३३९०) या क्रमांकाच्या अ‍ॅपे आॅटोला आग लागली़ दिलीप तुळसे यांचा हा अ‍ॅपे होता़ अग्निशमच्या जवानांनी लगेच ही आटोक्यात आणली़ तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता खुदबईनगर येथे चुना भट्टीजवळ डीपीच्या शेजारी असलेल्या घराला आग लागली होती़ आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला़ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कापूस संशोधन केंद्राजवळ संरक्षक भिंतीच्या ठिकाणी आग लागली होती़ या ठिकाणी वाळलेले गवत व इतर भंगारचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते़ आग वेळीच शमविल्यामुळे शेजारील एसक़े़टायर व इतर गॅरेजपर्यंत पोहचू शकली नाही़दरम्यान, शुक्रवार रात्र अन् शनिवारी अशा सलग आगीच्या घटनांमुळे अग्निशमन दलाची मात्र चांगलीच दमछाक झाली़ सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही़

टॅग्स :fireआगcottonकापूस