नांदेडमध्ये पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:29 IST2018-08-22T14:28:41+5:302018-08-22T14:29:27+5:30
पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तीन दिवसानंत रआज सकाळी १० च्या सुमारास चेंडकापूर येथे सापडला.

नांदेडमध्ये पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
नांदेड : हदगाव तालुक्यातील कवाना येथे एका नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या भारत तोरकड या ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह तीन दिवसानंत आज सकाळी १० च्या सुमारास चेंडकापूर येथे सापडला.
जिल्ह्यात १९ आॅगस्टपासून जोरदार पाऊस झाला होता़ या पावसामुळे अनेक भागातील नदी-नाल्यांना पूर आला होता़ हदगाव तालुक्यात कवाना येथे भारत तोडकर हा ४२ वर्षीय शेतकरी वाहून गेला होता़ त्याचा शोध दोन दिवसापासून सुरूच होता़ नांदेड येथून जीवरक्षक दलाचे एक पथकाने कवाना येथे दोन दिवस शोधमोहीम राबवली़ तिसऱ्या दिवशी तोडकर यांचा मृतदेह चेंडकापूर शिवारात सापडला़