शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेपोटी गुरू केलेल्या भोंदूबाबानेच लग्नाचं आमिष दाखवून विधवा महिलेवर केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:59 IST

एका नामांकित मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

नांदेड- शहरातील एका नामांकित मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै २०२५ पासून सुरू होता. नंतर मात्र संन्यासी असल्याचं सांगून लग्नाला नकार देत पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाकण्याची धमकीही दिली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

पीडित महिलेचं (४७ वर्ष) १२ वी पर्यंत शिक्षण झालं असून पतीचं निधन झाल्याने त्या तरोडा खु.भागात एका अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहतात. आयुष्याच्या उतारवयात अध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. परिसरातील इतर महिलांसोबत त्या १२ मे २०२५ रोजी पौर्णिमेनिमित्त गाडीपूरा येथील प्रसिद्ध मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी महिलेची आरोपी संत हरीगिर दत्तगिर गिरी महाराज (३८ वर्ष) याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने जून महिन्यात संत हरिगिर दत्तगिर महाराजला गुरू केलं.

दर गुरुवारी त्या मठामध्ये गुरूच्या दर्शनासाठी जात होत्या. सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्या मठामध्येच महापुजेसाठी थांबत होत्या. त्यावेळी हरिगिर महाराज हा पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही बाब पीडितेच्या लक्षात आली नाही. नंतर त्याने बाईल नंबर घेवून आपला नंबर दिला. त्यावरुन रात्री उशिरापर्यंत हरिगिर महाराज हा पीडितेशी बोलत होता.

१४ जुलै रोजी महिलेचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी हरिगिर याने घरी येण्याचा आग्रह धरला. अखेर १६ जुलै रोजी ते महिलेच्या घरी आला. तिने हरिगिर याची पाद्यपूजा करीत आर्शिवादही घेतले. बराच वेळ बसल्यानंतर त्यांनी महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली. परंतु तिने विरोध केला. यावेळी जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही दोन वेळेस या भोंदूबाबाने अत्याचार केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी भाूेंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.

संन्यासी असल्याने लग्नास नकार

हरिगिर महाराज याने पीडिता ही विधवा असल्याची संधी साधून अत्याचार केल्यानंतर लग्नाचं आमिष दाखविलं होतं. परंतु नंतर मात्र संन्यासी असल्याने लग्न करता येत नाही असं म्हणत नकार दिला. तसेच वेळोवेळी पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक अशी धमकीही हरिगिरकडून देण्यात येत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru Exploits Widow, Promises Marriage, Then Threatens Her

Web Summary : A fake guru in Nanded, posing as a saint, allegedly exploited a widow by promising marriage and then sexually assaulting her. He later refused to marry her, citing his monastic vows, and threatened her to keep silent. Police have arrested the accused.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस