फडणवीस यांची 'रॉयल्टी' एकाच व्यक्तीकडे असल्याने हमरीतुमरीचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:23 IST2020-01-28T11:23:03+5:302020-01-28T11:23:55+5:30

चव्हाणांचा खासदार चिखलीकरांना टोला

Fadnavis's 'royalty' to one person in Nanded; Chavan's toppled MP Chikhlikar | फडणवीस यांची 'रॉयल्टी' एकाच व्यक्तीकडे असल्याने हमरीतुमरीचे प्रकार

फडणवीस यांची 'रॉयल्टी' एकाच व्यक्तीकडे असल्याने हमरीतुमरीचे प्रकार

ठळक मुद्देनांदेड भाजपातील खासदार- आमदारांमध्ये वाद

नांदेड- फडणवीस यांची 'रॉयल्टी' एकाच व्यक्तीकडे असल्याने इतरांना संधी मिळत नाही, त्यामुळे भाजपात आमदार आणि खासदारात हमरीतुमरी चे प्रकार घडत आहेत, असा टोला बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला. 

सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार प्रताप पाटील चिखलीकर वगळता भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आमदार विमानतळ येथे गेले होते. त्या ठिकाणी बैठकीत उपस्थित राहण्यावरून खासदार आणि आमदारातील वाद हमरीतुमरी आणि शिवीगाळ वर आला होता. या विषयावर चव्हाण म्हणाले,नांदेडमध्ये अशा गोष्टी घडणे योग्य नाही असे म्हणत चव्हाण यांनी फडणवीस आणि चिखलीकर यांना टोला लगावला. फडणवीस यांची रॉयलटी एकाच व्यक्ती कडे आहे, जिल्ह्यात सर्व अधिकार सेंटरलाईज झाले आहेत.त्यामुळे इतर लोक नाराज असतील. त्यातूनच ही घटना घडल्याचा चिमटा ही चिखलीकर यांना काढला.

Web Title: Fadnavis's 'royalty' to one person in Nanded; Chavan's toppled MP Chikhlikar