शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

टंचाई उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:34 AM

पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रकल्प कोरडेच जिल्ह्यात १६० टँकरने पाणीपुरवठा सुरूपाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता कायम

नांदेड : पाणीटंचाई उपाययोजनासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून अनेक भागात पाण्याअभावी टंचाई परिस्थिती कायम आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना ३० जूनपर्यंत करण्यास मान्यता होती. मात्र पाऊस लांबल्याने राज्यातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती कायम आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड, लोहा, नायगाव, भोकर, नांदेड, कंधार आदी तालुक्यांत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू झाला असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. नांदेड जिल्ह्यात आजघडीला १६१ टँकर सुरू आहेत. या टँकरचे आदेश ३० जूनपर्यंत होते. आवश्यकता भासल्यास हे टँकर पुन्हा सुरू ठेवायचे की नाही? याबाबत १ जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील. टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्याचवेळी प्रशासनाकडूनही शासनाला विचारणा केली होती. ही बाब लक्षात घेवून २९ जून रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने टंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी १ आॅगस्टपर्यंत चारा छावण्यातील जनावरांसाठी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुभा दिली आहे.२०१८-१९ या टंचाई कालावधीत शासनाने पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात आलेल्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती उपाययोजनांसाठी प्राप्त होणाºया निविदांना चालू दर सुचीनुसार १० टक्केपर्यंत जादा दराच्या निविदा स्वीकारण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे आदेश १५ जुलैपर्यंत लागू राहतील. तसेच विहीर, तलाव उद्भवावरुन डिझेल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डिझेलचा खर्च टंचाई निधीतून करण्याबाबतचा निर्णयही १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहे.३० जूननंतर टंचाईअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवायच्या असल्यास जिल्हाधिकाºयांनी टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेवून टंचाई असलेल्या भागामध्ये उपाययोजना सुरू ठेवायच्या की नाही? याचा निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे १ जुलै रोजी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेवून टँकर तसेच इतर योजनांबाबत निर्णय होणार आहेत.जिल्ह्यात केवळ ५ टक्के जलसाठानांदेड जिल्ह्यात असलेल्या एकूण १११ प्रकल्पांत आजघडीला केवळ ४.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागीलवर्षी याच कालावधीत हा जलसाठा २० टक्के इतका होता. जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी १ विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे तर मानार प्रकल्पात १०.९० दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या जलसाठ्याची टक्केवारी ७.८९ इतकी आहे. नऊ मध्यम प्रकल्पांमध्ये २.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या मध्यम प्रकल्पांची क्षमता ३०.५८ दलघमी इतकी असताना आज या प्रकल्पात केवळ ३.५१ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात ८ उच्चपातळी बंधारे आहेत. या बंधाºयात ८.६ दलघमी म्हणजे ४.७८ टक्के जलसाठा उरला आहे. जिल्ह्यात एकूण ८८ लघु प्रकल्प आहेत. या लघु प्रकल्पात ८.१५ दलघमी जलसाठा उरला आहे. जिल्ह्यात एकूण जलसाठा २०.६२ दलघमी इतका असून त्याची टक्केवारी ४.२३ इतकी आहे.लोहा न.प.ने केली टँकरची मागणीलोहा शहराला २४ मे पासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकर आदेशाची मुदत ३० जून रोजी संपत आहे. लोहा शहर व ग्रामीण भागात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना असलेल्या सुनेगाव तलावातही पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. सुनेगाव तलावातून लोहा शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे लोहा शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मुदत आणखी ३० दिवस वाढवून देण्याची मागणी लोहा न.प.च्या मुख्याधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई