खळबळजनक ! १७ वर्षीय मुलाचा मृतदेह विद्युत खांबास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 19:47 IST2021-12-15T19:47:09+5:302021-12-15T19:47:42+5:30
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, आत्महत्या कि घातपात याची चर्चा परिसरात सुरु आहे

खळबळजनक ! १७ वर्षीय मुलाचा मृतदेह विद्युत खांबास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
नांदेड: एका १७ वर्षीय मुलाचा मृतदेह विद्युत खांबाला स्वेटरने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी आंबेडकर चौक येथील बसस्थानकाच्यामागे उघडकीस आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'सिडको' परिसरातील ढवळे कॉर्नर तथा रमाई आंबेडकर चौक येथील शहर बसस्थानकाच्या पाठीमागील विद्युत खांबाला १५ डिसेंबर रोजी सकाळी सातवाजेचेपूर्वी अरूण रविंद्र पवळे (रा. बळीरामपूर ता. नांदेड) याचा स्वेटरने गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच हेडकॉन्स्टेबल साहेबराव मुपडे व पोकॉ तानाजी ठाकूर यांनी प्र. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला.
याप्रकरणी रेखाबाई रविंद्र पवळे (रा. बळीरामपूर ता. नांदेड) यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल साहेबराव मुपडे व पो. कॉ. तानाजी ठाकूर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. अरूण पवळे याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, ही आत्महत्या नसून घातपात असावा, अशी चर्चा बळीरामपूर व परिसरात सुरू आहे.