शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

बोंडअळीमुळे कंधार तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील पांढरे सोने झाले बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:14 IST

६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ 

कंधार (नांदेड ) : तालुक्यात ६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ 

कंधार, कुरुळा, फुलवळ, बारूळ, पेठवडज, उस्माननगर या ६ महसूल मंडळात शेतक-यांनी ६६ हजार १०२ हेक्टरवर खरीप पेरणी केली़ त्यात कापूस, सेयाबीनची लागवड सर्वात जास्त होती़ त्यात १२ हजार ५७ शेतकºयांनी १७ हजार २२५ हेक्टरवर कापसाची लागवड केली़ सुरुवातीला अत्यल्प पर्जन्यामुळे वाढीवर परिणाम झाला़ आणि आता वेचणीचा हंगाम सुरू झाल्यावर बोंडअळीची लागण झाली़ कोरडवाहू शेती व बागायती शेतीतील कापूस उतारा प्रचंड घटला़ शेतकरी हवालदिल झाला़ बोंड अळीने फुले, बोंडे, पाते नाहीसे केले़ थोडासा कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी करावी लागली़ परंतु या अळीचा प्रादुर्भाव मजुराच्या शरीरावर खाजेद्वारे होण्याची भीती असल्याने ते ही  धास्तीने ग्रासले आहेत़ त्यामुळे  वेचणीचा भाव वधारला आहे़ पण खर्च आणि उतारा याचा ताळमेळ बसत नाही़ आणि शेतक-यांनी अनेक गावांत कापसात जनावरे सोडली़ अखेर शेतक-यांनी नुकसान भरपाईसाठीची मागणी केली़

कापूस अधिनियमातील तरतुदीनुसार तक्रारीचा सूर वाढला़ तक्रार अर्जासोबत कापूस बियाणाचे बिल, पिशवी, सातबारा आदी देणे भाग आहे़ अर्जानंतर मंडळ कृषि अधिकारी तथा बील निरीक्षक पाहणी करत आहेत़ एच फॉर्ममध्ये सर्व माहिती भरत आहेत़ आय फॉर्ममध्ये जिल्हास्तरीय समिती गावोगाव भैट देवून रँडम पद्धतीने हे काम चालू आहे़ त्यात कापूस संशोधन केंद्र, नांदेडचे डॉ़ढोक, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड व मंडळ कृषि अधिकारी गावोगाव जाऊन अहवाल तयार करत आहेत.  १२६ महसुली गावे, वाडी तांड्यावरील शेतक-यांपैेकी १०६ गावातील अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यानुसार बारूळ, कौठा, उस्माननगर, लाठ खु़, पेठवडज, गोणार, आंबुलगा, हरबळ, घोडज, शेकापूर, गंगनबीड, नागलगाव, कुरुळा आदी गावातील आय फॉर्म भरणे चालू आहेख़रीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे खरेदी बील, पिशवी कुठे ठेवले? याची शोधाशोध शेतकरी करत आहेत़ अनेकांना हे सापडत नाहीत़ त्यामुळे अडचणीत मोठी भर पडत आहे़ त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, असा सूर शेतक-यांत उमटत आहे.

बाधित कापूस क्षेत्राची पाहणी सुरूबोंडअळी बाधित कापूस क्षेत्राची पाहणी केली जात आहे़ प्राप्त अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाईल़ बोंड अळी नियंत्रणासाठी डिसेंबर अखेर नांगरटी खोल करून घ्यावे़ त्यामुळे अळीचे अवशेष नष्ट होतील़ आणि पुढील वर्षी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल़ शेतक-यांनी असे केल्यास अळीला पायबंद बसेल - संजय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, कंधाऱ 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीNandedनांदेड